महाराष्ट्रात सध्या वाईन वरून चांगलेच राजकारतं तापताना दिसत आहे. महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने दोन दिवसांपूर्वी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्यात किराणा दुकाने आणि सुपर मार्केट मध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचे ठरवले आहे. या निर्णयावरून ठाकरे सरकार टीकेचे धनी होताना दिसत असले तरी सरकारकडून मात्र या निर्णयाचे जोरदार समर्थन केले जात आहे.
यावरूनच आज भाजपा नेते गोपिचंद पडळकर यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. वाईन म्हणजे दारू नाही असे म्हणणारे संजय राऊत हे झिंग झिंग झिंगाट झाले आहेत असा घणाघात पडळकर यांनी केला आहे.
हे ही वाचा:
अंधश्रद्धा निर्मूलन समितीतील वाद चव्हाट्यावर
दादा काय सांगता…वाईन म्हणजे दारू नाही?
आश्चर्य!!! सहा महिने बेशुद्ध राहून कोरोनावर केली मात
‘सुपर मार्केटमधून दारू विकण्याऐवजी प्राथमिक सुविधा द्या’
काय म्हणाले पडळकर?
“जनाब संजय राऊत हे देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांमुळे पुरते बावचळले आहेत. परदेशात वाईन मालकांसोबत झालेल्या बैठकीतबाबत खुलासा करतील या भीतीपोटी. यामुळेच राऊतांचे झिंग झिंग झिंगाट झाले आहे.
शेतकऱ्यांना आजवर ज्या गोष्टींचा सामना करायला लागला नव्हता ते सगळं महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना भोगावं लागत आहे. गावंच्या गावं अंधारात गेली आहेत. ऐन कापणीच्या हंगामात वीज तोडली आहे. जर खरोखरच हे धोरण राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारेल असा दावा क तर शेतकऱ्यांना ही खात्री देणार की सुपर मार्केटमध्ये केवळ महाराष्ट्रात तयार झालेलीच वाईन विक्रीलाच परवानगी दिली जाईल आणा परदेशातील बैठकीत सहभगी झालेल्या कंपनींना नाही. टक्केवारीसाठी वाईन ही दारू नाही असे म्हणणाऱ्यांचा मी जाहीर निषेध करतो असेही पडळकर यांनी म्हटले आहे.”
जनाब @rautsanjay61 झिंग झिंग झिंगाट झाले आहेत.मा.@PawarSpeaks नावाचा वापर करून ते #वाईन विक्रीचं समर्थन करतायत.जे #पवारांनी आयुष्यात सोसलं आहे,त्याची खंतही जाहीरपणे व्यक्त केली आहे,त्यामुळेच ते महाराष्ट्राच्या युवा पिढीला नशेत ढकलण्याची भूमिका कधीही घेणार नाहीत.@BJP4Maharashtra pic.twitter.com/Q6RjnksZXp
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) January 29, 2022