चिल्लर त्याला आणि नोटा बारामतीला, अनिल देशमुख प्रकरणी पडळकरांची टीका

चिल्लर त्याला आणि नोटा बारामतीला, अनिल देशमुख प्रकरणी पडळकरांची टीका

“ज्यांनी राज्याच्या राजकीय घराण्यात भांडणं लावून घरं फोडली त्याच शरद पवारांच्या घरात आता टोकाची भांडणं सुरु आहेत. मला त्यांना सांगायचंय की नियतीचा न्याय इथेच असतो. मेंढ्यांचं नेतृत्व कधीच लांडग्याकडे नसतं”, अशा शब्दात भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा जागेवर पोट निवडणूक होत आहे. राष्ट्रवादी आणि भाजपाने ही जागा अतिशय प्रतिष्ठेची केली आहे. दोन्ही पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी प्रचाराची राळ उडवलीय. काल (गुरुवार) प्रचाराच्या तोफा थंडावल्या. शेवटच्या दिवशी पडळकरांनी आवताडे यांच्या प्रचारार्थ सभा घेत राष्ट्रवादीवर आणि पवारांवर तुटून पडले.

“ज्यांनी राज्यातल्या घराघरात भांडणं लावली, त्यांच्याच घरात आता टोकाची भांडणं आहेत. मात्र मला त्यांना सांगायचंय की नियतीचा न्याय इथेच असतो. राष्ट्रवादीने गोरगरिबांच्या घरावरुन गाढवाचा नांगर फिरवला. मेंढ्याचं नेतृत्व कधीच लांगडा करत नाही” असे गोपीचंद पडळकर म्हणाले.

“राष्ट्रवादी खूप हुशार आहे. बघतानाच गरीब घरचा गृहमंत्री बघतात. साहजिक चिल्लर त्याला आणि नोटा बारामतीला”, अशा शब्दात पडळकर पवारांवर आणि राष्ट्रवादीवर तुटून पडले.

“एपीआय सचिन वाझे प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यायला लागला. या काळात जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे खूपच खुलले होते, मात्र दिलीप वळसे पाटील या गरिबाला गृहमंत्रिपद दिलं”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

हे ही वाचा:

माजी सीबीआय संचालक रणजीत सिन्हा यांचं निधन

टीपू सुलतान जयंती साजरी करणारी शिवसेना

राज ठाकरेंनी मानले मोदी सरकारचे आभार

मुंबईत सॅनिटाझर यंत्रणा बसविण्यासाठी जनहित याचिका दाखल

दुसरीकडे पडळकर यांनी अनिल देशमुख यांनाही टोला लगावला. “राज्यात सीबीआयला परवानगीशिवाय एन्ट्री देणार नाही, अशी भाषा काही दिवसांपूर्वी काहीजण बोलत होते. आता त्यांचीच चौकशी सीबीआय करत आहे” असं पडळकर म्हणाले.

Exit mobile version