22 C
Mumbai
Tuesday, December 17, 2024
घरराजकारण'एसटी संप चिघळवून जमिनीची विल्हेवाट लावण्याचा डाव दिसतोय'

‘एसटी संप चिघळवून जमिनीची विल्हेवाट लावण्याचा डाव दिसतोय’

Google News Follow

Related

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अजूनही तोडगा निघालेला नाही. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी या संपाला मुंबईच्या आझाद मैदानात उपस्थित राहून पाठींबा दिला होता. मात्र आता या संपकरी कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्याची टांगती तलवार असल्याने पुन्हा एकदा गोपीचंद पडळकर यांनी अनिल परब आणि सरकारवर निशाणा साधला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी ट्विटवर एक व्हिडिओ शेअर करत अनिल परब यांना धारेवर धरले आहे. अनिल परब यांनी स्वतःचे अपयश लपवण्यासाठी सदाभाऊ खोत आणि माझ्यावर आरोप केले की, एसटी कर्मचाऱ्यांची डोकी आम्ही भडकवत आहोत, असे गोपीचंद पडळकर म्हणाले. तीन आठवड्यांचा कालावधी झाल्यावरही ते आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांचा विश्वास सम्पादन करण्यात मंत्री म्हणून अपयशी ठरले आहेत, असे पडळकर यांनी म्हटले. अनिल परब हे आता मुघलशाही पद्धतीने मेस्मा कायदा लावण्याची धमकी देत आहेत, असेही पडळकर म्हाणाले.

हे ही वाचा:

बिपिन रावत यांच्या निधनावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर होणार कारवाई

तमिळ दिगदर्शक अली अकबर का सोडत आहेत इस्लाम?

… म्हणून ३०० मिनिटांसाठी एसबीआयच्या इंटरनेट सेवा राहणार बंद

एमआयएमची तिरंगा रॅली मुंबईच्या दिशेने

मुंबईमध्ये मिल कामगारांचा संप झाला होता, त्या संपाला चिघळवण्याचे काम करण्यात आले. त्यानंतर त्या संपाचा विषय अनिर्णीत ठेवून मिल मालकांशी हात मिळवणी करत त्या सर्व करोडो रुपयांच्या जागा लाटल्या गेल्या, त्यामध्ये घोटाळा केला गेला. आता तसाच एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळवून विविध मोक्याच्या जागा ताब्यात घेऊन त्यांची विल्हेवाट लावण्याचा डाव अनिल परब आणि सरकारचा दिसत असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा