कुडमुड्या गोखले गँगचा गलका

कुडमुड्या गोखले गँगचा गलका

कोरोनाने आपल्या सर्वांचेच आयुष्य थांबवले आहे. दिवसागणिक वाढणारी रुग्णसंख्या चिंताजनक आहे. भारत आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेला देश झाला आहे आणि अशात आपले राज्य अर्थात महाराष्ट्र देशातील सर्वात जास्त रुग्ण संख्या असलेले राज्य झालेले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनच हलगर्जीपणामुळे हे संकट हाताळण्यात महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरले आहे. कोणत्याही प्रकारची ठोस यंत्रणा नाही किंवा उपाययोजना नसल्यामुळे जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण होत आहे. स्मशान भूमीमध्ये शवांचे खच लागत आहेत, औषधांच्या अभावी लोकं हतबल होत आहेत, आयसीयू बेडच्या कमतरतेमुळे रुग्ण रुग्णालयांच्या दारात खितपत मृत्युमुखी पडत असताना राज्य सरकारमधील नेते आणि त्यांच्या चेल्यांना गलिच्छ राजकारण करावेसे वाटत आहे याहून मोठे दुर्दैव आपल्या राज्याचे नाही. स्वतःचे अपयश केंद्रावर ढकलून महाराष्ट्राच्या जनतेमध्ये केंद्र आणि भाजपा विषयी खोट्या बातम्या पसरवण्याचे कार्य हे राज्य सरकार मधील नेते आणि त्यांचे चेले करताना दिसत आहेत. खोट्या बातम्या पसरवण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या साकेत गोखले यांनी रविवारी असेच काहीसे केले.

देशभर भाजपाविरोधात अपप्रचार करण्यासाठी, एक काँग्रेस पुरस्कृत टोळी काम करतेय. कुठल्याही घटनेवरून, भाजपावर खोटे आणि बिनबुडाचे आरोप करणे एवढेच या टोळीचे काम. याच टोळीतील एक प्रमुख चेहरा म्हणजे साकेत गोखले.

हे ही वाचा:

कशी आली केंद्राची ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्राच्या मदतीला?

दिल्लीत सोमवारपर्यंत पूर्ण लॉकडाऊन

महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर

कुंभ मेळा असो की रमजान कुठेही कोरोना नियमांकडे दुर्लक्ष करता येणार नाही

काँग्रेस समर्थक आणि समाजमाध्यमात पुरावे सादर न करता भीती पसरवणाऱ्या साकेत गोखले यांनी पुन्हा एकदा खोटी बातमी पसरवली. त्याच्या मते विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून ४.७५ कोटी रुपये किमतीचे रेमडेसीवीर इंजेकशन पक्ष कार्यालयावर साठवून ठेवण्यात आले होते.

मुंबई पोलिसांनी दमण-दिऊ स्थित ब्रुक फार्मासुटिकल कंपनीच्या मालकाला ताब्यात घेतल्यानंतर हे आरोप केले गेले. महाराष्ट्र भाजपाने राज्यामध्ये मध्ये रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा पाहता या कंपनी कडून ज्यादा पुरवठ्याची मागणी केली होती. जेव्हा कंपनीने ज्यादा मागवलेल्या इंजेक्शन चा पुरवठा तयार केला तेव्हा त्यांच्या मालकांना ताब्यात घेण्यात आले. देवेंद्र फडणवीसांनी आवाज उठवल्यावर कंपनी डायरेक्टरला सोडण्यात आले.

साकेत गोखले यांनी केलेले गंभीर आरोप सिद्ध करण्यासाठी त्यांनी कोणत्याही प्रकारचा पुरावा जोडला नाही, आणि या आरोपांची सत्यता न पडताळता गोखले यांच्या गोष्टीला खरं मानून अनेक राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी देखील गोखलेंच्या वक्तव्याला समर्थन दिले.

साकेत गोखले यांनी कोणते दावे केले:

पहिल्या आरोपात गोखले म्हणाले : देवेंद्र फडणवीसांसारख्या “PRIVATE INDIVIDUAL” ने गुजरात मधून रेमडेसीवीर इंजेक्शनचा पुरवठा कसा मागवला, जेव्हा या इंजेक्शन चा सेल ला केवळ सरकार परवानगी देऊ शकते ?”

मीडियाशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट पणे सांगितले होते की, “महाराष्ट्र भाजपाचे नेते, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड,चार दिवसापूर्वी दमण मधील ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला रेमडेसीवीर इंजेक्शनच्या तुटवड्याबद्दल बोलायला म्हणून गेले होते. त्यावेळेला कंपनीच्या मालकांनी हे इंजेक्शन राज्य सरकारला पुरवण्याची तयारी दाखवली, पण त्यांच्याकडे इंटर्नल डिस्ट्रिब्युशनचे लायसेन्स नाही असे त्यांनी सांगितले. मी, केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीयांशी संवाद साधला, त्यांनी ब्रुक फार्मा कंपनीचा टाय अप रेड्डीज सोबत करून त्यांना लायसन्स मिळवून दिले.”

राज्यामध्ये अत्यावश्यक असलेल्या रेमडेसीवीर इंजेक्शन चा तुटवडा पाहता ही मागणी विरोधी पक्ष भाजपाने केली होती हे यावरून स्पष्ट झाले आणि हेही स्पष्ट झाले की ही कोणती खाजगी डील नसून याची पूर्ण कल्पना सरकारला होती कारण फडणवीसांनी नमूद केल्याप्रमाणे त्यांनी केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीया यांच्याशी संपर्क साधला होता. मनसुख मांडवीया यांनी हे औषध पुरवठ्यासाठी लागणाऱ्या लायसेन्सला परवानगी लगेचच दिली. त्यामुळे गोखलेंचा पहिला आरोप खोटा सिद्ध होतो, की यात फडणवीसांनी खाजगी मार्गाने हे औषध मिळवण्याचा प्रयत्न केला आणि गोखलेंप्रमाणे हि कंपनी गुजरात मध्ये आहे, पण खरंतर ही कंपनी दमण-दिऊ मध्ये आहे जो केंद्र प्रशासित प्रदेश आहे.

हे ही वाचा:

कोरोनाचे ‘जंतू’ फडणवीसांच्या तोंडात ‘कोंबणाऱ्या’ आमदाराविरोधात तक्रार दाखल

ठाकरे सरकारची अकार्यक्षमता झाकण्यासाठी नवाब मलिक यांनी खोटी माहिती दिली

‘या’ सहा राज्यातून येणाऱ्यांना कोरोना चाचणी अनिवार्य

आम्हाला गृहमंत्र्यांना पैसे द्यावे लागतात- पोलीस निरीक्षक

गोखलेंचा दुसरा आरोप : फडणवीसांनी राज्य सरकारसोबत चर्चा न करता रेमडेसीवीर इंजेक्शनचा साठा मिळवला.

राज्य विधानपरिषदेचे नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले आहे की या औषधाच्या पुरवठ्याची पूर्ण कल्पना महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांना देण्यात आली होती, कारण हे इंजेक्शन मिळवण्याची आणि वाहतुकीची परवानगी राज्य सरकारकडून मिळाल्या शिवाय काहीही होऊ शकत नाही. गोखले यांचा दुसरा आरोप सुद्धा बिनबुडाचा सिद्ध झाला.

पुढील ट्विट मध्ये गोखले यांनी तथ्यहीन आणि द्वेषापोटी एक आरोप केला की भाजपा महाराष्ट्र नेत्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा त्यांच्या पक्ष कार्यालयात केला आहे. पण हा आरोप सत्यापासून कोसो मैल दूर आहे. मंजुनाथ शिंगे, डेप्युटी कमिश्नर ऑफ पोलीस, झोन ८, यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितले की पोलिसांना एका स्टोरेज फॅसिलिटी मध्ये ६०,००० रेमडेसिवीर इंजेकशन च्या कुपी (vials) सापडल्या आणि या साठीच त्यांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकांना विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेतले.

नवाब मलिक यांच्या खोट्या आरोपांना पुढे नेत गोखले म्हणाले की केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यसरकारला रेमडेसिवीर इंजेकशन चा पुरवठा बंद केला आहे.

यावर भाजपा नेत्यांनी तातडीने उत्तर दिले. भाजपा खासदार मनोज कोटक यांनी विलंब न करता दोन्ही राज्यांच्या ( गुजरात आणि महाराष्ट्र ) FDA ची पत्र दाखवली आणि सांगितले की या गोष्टींमध्ये केंद्र सरकारची काहीही भूमिका नाही.

शेवटच्या ट्विट मध्ये रडका सूर आळवत गोखले यांनी एन.डी.ए. मध्ये नसलेल्या पक्षांच्या नेत्यांना टॅग करून त्यांच्या राज्यात भाजपा विरुद्ध चौकशी करायला सांगितली, की त्यांच्या राज्यात सुद्धा भाजपा असेच काही कारस्थान करत आहे का हे पहावे. केंद्र सरकारवर तथ्यहीन आरोप करत गोखले म्हणाले, “फडणवीस आणि मोदी सरकार यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रामधील रेमडेसिवीर इंजेक्शन चा पुरवठा बंद करायचा ठरवला आहे. त्यांनी ६०,००० रेमडेसिवीर इंजेक्शन त्यांच्या पक्ष कार्यालयात मुद्दाम साठवून ठेवले आहेत.”

पण हे जाणून घेणे अत्यावश्यक आहे की राज्य सरकारने सध्याची परिस्थितीला हाताळण्यात दाखवलेल्या विलंबामुळे विरोधी पक्षाला परिस्थिती हाताळण्यासाठी रिंगणात उतरावे लागले आहे.

अन्न आणि औषध प्रशासनातील अधिकाऱ्याने मान्य केले आहे की औषध उत्पादकांना थेट विक्री करण्यासाठी म्हणून इमर्जन्सी परवानगी देण्याचा ‘विचार’ ते करत आहेत. “सध्या फक्त चर्चेमध्ये हा विषय आहे.ब्रुक फार्मला अजून परवानगी दिलेली नाही’, असे त्याने पुढे नमूद केले.

ब्रुक फार्मची भूमिका:

ब्रुक फार्मा त्या १६ उत्पादकांपैकी एक आहे ज्यांना रेमडेसिवीर तयार करण्याची परवानगी आहे. त्यांचे उत्पादन केंद्र, दमण मधील दाभेल इथे असून त्यांना हे औषध निर्यात करायची परवानगी आहे. परंतु या कंपनीकडे विपणन लायसेन्स नाही आणि याच कारणास्तव विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे वजन वापरून एफ.डी.ए. कडून या कंपनीला परवानगी मिळवून दिली, जेणेकरून राज्याला आता गरज असलेल्या रेमडेसीवीर चा तुटवडा भासू नये.

सरतेशेवटी, साकेत गोखले आणि महाविकास आघाडी मधील मंत्र्यांनी केलेले सगळे आरोप हे राज्य सरकारचे अपयश लपवण्यासाठी केले आहेत हे स्पष्ट दिसून येतंय.

जेव्हा राज्यसरकार अपयशी ठरत आहे असं वाटतं तेव्हा तेव्हा त्यांना वाचवण्यासाठी म्हणून ठराविक टोळी पुढे येते. ज्यात राजदीप सरदेसाई, निखिल वागळे, अमेय तिरोडकर, राजू परुळेकर, प्रशांत कदम अश्यांची नावे प्रामुख्याने घ्यायला हवीत. चुकीच्या बातम्या पसरवून समाजामध्ये संभ्रम निर्माण करून महाविकास आघाडीतील नेत्यांची हुजरेगिरी करणे हा यांचा मुख्य पेशा आहे असंच वाटतं. गोखले यांचा इतिहास तसा हास्यास्पद आहे, कारण जेव्हा जेव्हा त्यांनी खोट्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा तेव्हा ते मुख्यमंत्र्यांच्या भाषेत तोंडावर ‘आपटले’ आहेत. आजही तसेच झाले.
अश्या संकट काळात राजकारण न करता, स्वतःचे अपयश मान्य करून राज्य सरकारने सगळ्यांची मदत घेऊन महाराष्ट्राला यातून कसे बाहेर काढायचे हा विचार केला पाहिजे, पण दुर्दैवाने, सत्तेच्या हव्यासापोटी आघाडी केलेल्या नेत्यांना समाजकारणापेक्षा राजकारण महत्वाचं वाटतं हेच खरं आहे

Exit mobile version