उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी आणि समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांनी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना पृथ्वीतलावर देवाने पहिले पुरुष निर्माण केले की पहिले स्त्रिया याबाबत वक्तव्य केले. समाजवादी पक्षाच्या महिला सभेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात डिंपल यांनी हे वक्तव्य केले. यावेळी अखिलेश यादवही उपस्थित होते.
डिंपल यादव यांनी लिंगभेदावर मोठे विधान केले आहे. लखनऊमध्ये झालेल्या महिला सन्मान समारंभात त्यांनी म्हटले की, देवाने प्रथम पुरुष निर्माण केले की स्त्रिया यावर चर्चा करायची झाल्यास माझे नक्कीच म्हणणे आहे की, पुरुषांनाचं देवाने प्रथम बनवले असावे, कारण पहिल्यांदा बनवताना चुका या होतातचं. पण, दुसऱ्यांदा देवाने महिलांना निर्माण केले आहे आणि त्यांना क्षमता दिली आहे. महिला एका कुटुंबात जन्माला येतात आणि नंतर दुसऱ्या कुटुंबात जातात आणि तिथे संपूर्ण कुटुंबाची काळजी घेतात. जर त्या व्यवसायात आल्या तर कुटुंबाची काळजी घेण्यासोबतच त्या त्यांची स्वप्ने देखील पूर्ण करतात.
डिंपल यादव यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यावर संमिश्र अशा प्रतिक्रिया येत आहे. काहींनी त्यांच्या विधानाला हास्यास्पद म्हटले आहे तर काहींनी टीकाही केली आहे. तुम्ही कोणत्या देवाला मानता? कुंभ मेळ्याची तुम्हाला समस्या आहे म्हणजे हिंदू देव नसणार. इफ्तार पार्टीत तुमचे खूप येणं-जाणं असते, त्यामुळे कदाचित त्याबद्दल बोलत असाल, अशा प्रतिक्रियाही काही वापरकर्त्यांनी दिल्या आहेत.
हे ही वाचा..
कोणीही कायदा, संविधान आणि नियमांपलीकडे जाऊ नये
साडेचार लाख मोहरेइस्लाम गार्सियांची हिंदू धर्मात लवकरच घरवापसी
नागपूर हिंसाचारातील मास्टरमाइंड फहीम खानच्या घरावर बुलडोझर
छत्तीसगडमध्ये २२ माओवाद्यांचे आत्मसमर्पण
समाजवादी पक्षाच्या महिला सभेने लखनऊमध्ये महिला सन्मान समारंभाचे आयोजन केले होते. महिला सभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा अखिलेश आणि डिंपल यांच्या उपस्थितीत, जूही सिंग यांनी विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सन्मान केला. डिंपलने पुरुष आणि महिला यांच्यातील तुलना आणि त्यांच्या संघर्षांबद्दल सांगितले. डिंपल म्हणाल्या की, समाजात अजूनही लिंगभेद आहे. समाजात पुरुषांच्या स्वप्नांना जास्त किंमत असते. महिलांसाठी महिलांना पुढे यावे लागेल. शिक्षण, आरोग्य, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात महिलांची भूमिका मजबूत करण्याची गरज आहे. जेव्हा महिला पुढे येतील तेव्हाच समाज आणि देश प्रगती करेल. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव म्हणाले की, महिलांशिवाय समाजाची प्रगती अपूर्ण आहे. आपल्याला प्रत्येक क्षेत्रात महिलांना समान संधी आणि सुरक्षा प्रदान करावी लागेल.