पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी महाराष्ट्रासह गोवा दौऱ्यावर होते. त्यांनी महाराष्ट्रात अनेक प्रकलपांचे लोकार्पण केले. तर त्यानंतर मोदी यांनी मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले. विशेष म्हणजे, या विमानतळाला माजी संरक्षण मंत्री आणि भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्यात आले आहे.
या विमानतळाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१६ साली करण्यात आली होती. त्यानंतर २०२२ साली पंतप्रधान मोदी यांच्याच हस्ते या विमानतळाचे उद्घाटन झाले आहे. या विमानतळाच्या उभारणीसाठी दोन हजार ८७० कोटी रुपये खर्च आला आहे.
उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले की, मोपा विमानतळाच्या उभारणीनंतर गोव्याच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे. हा मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील पायाभूत सुविधांबाबत सरकारचे विचार प्रतिबिंबित करतात. या विमानतळामुळे गोवा कार्गो हब बनण्याची शक्यता वाढली आहे, असंही मोदी यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा :
गुरव समाजासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
नागपूर मेट्रोने कोरले गिनीज बुकात नाव
सुखविंदर सिंग सुखू हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री
जर्सी बेटावर स्फोट, तीन मजली इमारत कोसळली
दरम्यान, मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे गोव्याच्या उत्तरेकडील भागात आहे.हे विमानतळ दिसायला खूपच प्रेक्षणीय आहे. जगातील सर्वात मोठी विमाने हाताळण्यासाठी धावपट्टीही येथे तयार करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात, विमानतळाची वार्षिक क्षमता तब्बल ४४ लाख प्रवासी आहे. तर प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, त्याची एकूण क्षमता वार्षिक दहा लाख प्रवासी इतकी होणार आहे.