गाेव्यामध्ये काॅंग्रेसला माेठा धक्का बसला आहे. गाेव्यातील काॅंग्रेसच्या आठ आमदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली. एकीकडे काँग्रेसने भारत जोडो पदयात्रेचे आयोजन केले आहे आणि गोव्यात मात्र काँग्रेसच्या या आमदारांनी भाजपाची वाट धरली आहे. ४० सदस्यांच्या गोवा विधानसभेत काँग्रेसचे ११ आणि भाजपचे २०आमदार आहेत. जुलै २०१९ मध्ये अशाच एका हालचालीत काँग्रेसच्या १० आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिगंबर कामत, मायकल लोबो, त्यांची पत्नी डेलीला लोबो, राजेश फळदेसाई, केदार नाईक, संकल्प आमोणकर, अलेक्सो सिक्वेरा आणि रुडॉल्फ फर्नांडिस हे आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि गोवा विधानसभेत राजीनामे घेऊन दाखल झाले आहेत. काँग्रेसच्या आठही आमदारांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची नंतरच्या दालनात भेट घेतली.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काँग्रेसच्या बंडखोर आमदारांचे स्वागत केले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे काम पाहून भाजपमध्ये सामील झालेल्या काँग्रेस आमदारांचे आम्ही स्वागत करतो. आम्ही त्यांना भाजपचे प्राथमिक सदस्यत्व बहाल करतो असे तानावडे यांनी पणजी भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
हे ही वाचा:
महाराष्ट्रातल्या या पक्षांवर निवडणूक आयोगाची कारवाई
अयोध्येतील राम मंदिरावर १८०० कोटी खर्च होणार
इलेक्ट्रिक स्कूटर रिचार्जिंग युनिटला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू
मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ जाहीर
गाेव्यात काॅंग्रेस छाेडाे यात्रा
राहुल गांधी १५० दिवसांच्या भारत जोडो यात्रेवर बाहेर असतानाच गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. भारत जोडो यात्रेचा आज आठवा दिवस असून कन्याकुमारी ते काश्मीर असा हा प्रवास प्रस्तावित आहे. हा संदर्भ घेऊन मुख्यमंत्री सावंत म्हणाले, काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेचे गोव्यात ‘काँग्रेस छोडो’ यात्रेत रूपांतर झाले आहे. नवीन भारत घडवण्याच्या पंतप्रधान मोदींच्या संकल्पाने प्रभावित होऊन हे सर्व आमदार बिनशर्त आमच्यात सामील झाले आहेत. २०२४ मध्ये गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला