मुंबई महापालिकेने गाजावाजा करत काढलेले ग्लोबल टेंडर हे अखेर रद्द केले आहे. निविदा पाठवलेल्या नऊ कंपन्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे हे ग्लोबल टेंडर रद्द करण्यात आले आहे. लसीकरणाच्या मुद्द्यावरून मुंबई महापालिकेने घातलेल्या सावळा गोंधळावरून पालिकेवर चौफेर टीका होत आहे. तर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिकेचे ग्लोबल टेंडर हा घोटाळाच होता याचा पुनरुच्चार केला आहे.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शुक्रवार, ६ जून रोजी ग्लोबल टेंडर रद्द करण्यात आल्याचे घोषित केले. या ग्लोबल टेंडरसाठी काही पुरवठादारांनी भाग घेतला होता. प्रत्यक्ष लस उत्पादन करणाऱ्या कंपन्या त्यात नव्हत्या. मात्र या पुरवठादारांची कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने हे टेंडर रद्द झाले आहे. महापालिका आता यासाठी नव्याने प्रयत्न करणार आहे, असेही त्या म्हणाल्या. लसींचा साठा उपलब्ध होईल असे आमचे प्रयत्न आहेत. स्पुटनिकचे वितरण करणाऱ्या रेड्डीज लॅबशी चर्चा केली आहे. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. जूनअखेरपर्यंत त्यांनी तशी तयारी दाखविली आहे.
हे ही वाचा:
‘आम्ही भजन करण्यासाठी पक्ष चालवत नाही’
कोरोना आजार नाही,अल्लाहची माफी मागून होईल सुटका! सपा खासदाराची मुक्ताफळे
मोदींच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली कोरोनाची दुसरी लाट आली आटोक्यात
पण भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी सुरवातीपासूनच हे ग्लोबल टेंडर म्हणजे महापालिकेचा घोटाळा असल्याचे म्हटले होते. सुरुवातीला या टेंडरला अपेक्षित प्रतिसाद न आल्यामुळे त्याची मुदत वाढविण्यात आली. मंगळवार, दिनांक २५ मे रोजी या टेंडरची मुदत संपत होती. सुरुवातीला या टेंडरच्या प्रतिसादात ३ निविदा आल्या होत्या. तर शेवटच्या एका तासात ५ निविदा आल्या. या सार्या निविदा बोगस असून यात कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली नसल्याचे सोमैय्या यांनी म्हटले होते. तर कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी महानगरपालिकेने ग्लोबल टेंडरची मुदत वाढवून ३० जून पर्यंत पुढे नेली असा गंभीर आरोप किरीट सोमैय्या यांनी केला होता. त्याचाच पुनरोच्चार सोमैय्या यांनी केला आहे.
At last BMC Forced to Scrap it's 1 Crore #COVID Vaccine Global Tender. It was nothing but FRAUD. Last Day Last Hour 5 FAKE Bidders applied. Yesterday only Mayor had announced Tender will b accepted in 2 days.
We STOPPED BMC COVID Vaccine GHOTALA @BJP4Maharashtra @BJP4India pic.twitter.com/eAFXv2UicK
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 4, 2021