पंतप्रधान मोदींचा ‘धन धना धन ढोल’

पंतप्रधान मोदींचा ‘धन धना धन ढोल’

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लास्गोमधील यशस्वी दौऱ्याचा समारोप ढोल वाजवत केला. ग्लास्गोमधून परतीचा प्रवास सुरू करण्याआधी पंतप्रधान मोदींनी भारताच्या सांस्कृतिक राजदूतांशी अर्थात ग्लास्गोमधील भारतीय वंशाच्या नागरिकांशी संवाद साधला. याच वेळी पंतप्रधान मोदींनी ढोल वाजवण्याचाही आनंद लुटला

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय परिषदांच्या निमित्ताने स्कॉटलंड मधील ग्लास्गो येथे होते. या वेळी त्यांनी COP26 या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग नोंदवला. या परिषदेत त्यांचे भाषण देखील झाले. तर काही राष्ट्रपरमुखांसोबत त्यांच्या बैठकाही झाल्या. आपल्या परतीच्या प्रवासाला सुरूवात करण्याआधी त्यांनी सवईप्रमाणे भारतीय समुदायाची भेट घेतली. या वेळी भारताच्या लाडक्या पंतप्रधानांच्या स्वागतासाठी ढोल ताशा वादनाचे आयोजन करण्यात आले होते. ढोल ताशाच्या गजरात आणि ‘भारत माता की जय’ च्या घोषणा देत पंतप्रधान मोदींचे जंगी स्वागत करण्यात आले.

हे ही वाचा:

ग्लास्गोमध्येही पंतप्रधान मोदींचे कलम ३७० हटवण्यासाठी कौतुक

स्वातंत्र्यवीरांवर होणाऱ्या क्षमापत्रांच्या आरोपाचे सप्रमाण खंडन करणारे अक्षय जोग यांचे नवे पुस्तक

‘पंजाब लोक काँग्रेस’सह कॅप्टन मैदानात

फडके रोड राहणार सुना सुना, जमावबंदी लागू

पंतप्रधान मोदींनी उपस्थित सर्व भारतीयांशी हस्तांदोलन करत संवाद साधला. यावेळी पंतप्रधान ढोलवादन करणाऱ्या चमूलाही भेटायला गेले. पांढरा झब्बा, भगवे मोदी जॅकेट आणि भगवा फेटा अशा वेषातले हे ढोल ताशा पथक एक आकर्षणाचा केंद्र बनले होते. पंतप्रधान मोदींना भेटल्यावर या पथकातील सदस्यांनी त्यांना ढोल वाजवण्याची विनंती केली. पंतप्रधान मोदींनाही त्यांची ही इच्छा नाकारता आली नाही. पंतप्रधानांनी धोल वादनाची काठी हातात घेत ढोलवादन सुरू केले. त्यांच्या या वादनामुळे उपस्थितांचा उत्साह द्विगुणित झालेला दिसला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आधीही निरनिराळ्या प्रसंगी वाद्य वादनाचा आनंद लुटला आहे. मोदींचे हे रूप सोशल मीडियावर चांगलेच पसंतीचे असून त्यांचे हे वादनाचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होताना दिसतात.

Exit mobile version