ग्लास्गोमध्येही पंतप्रधान मोदींचे कलम ३७० हटवण्यासाठी कौतुक

ग्लास्गोमध्येही पंतप्रधान मोदींचे कलम ३७० हटवण्यासाठी कौतुक

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ साली दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर ऐतिहासिक निर्णय घेण्याचा धडाका सुरू केला. जम्मू काश्मीर राज्याला कलम ३७० आणि ३५ अ च्या जोखडातून मुक्त करणे हा त्याचाच एक भाग. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीसठी आजही भारतभर त्यांचे कौतुक होताना दिसतेच. पण परदेशातही त्यांच्या या कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव होत असतो. याची प्रचिती नुकतीच ग्लास्गो येथे आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय परिषदांच्या निमित्ताने स्कॉटलंड मधील ग्लास्गो येथे होते. या वेळी त्यांनी COP26 या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग नोंदवला. या परिषदेत त्यांचे भाषण देखील झाले. तर काही राष्ट्रपरमुखांसोबत त्यांच्या बैठकाही झाल्या.

हे ही वाचा:

भाजपासाठी का आहे मध्यप्रदेशच्या जोबटचा विजय महत्वाचा?

स्वातंत्र्यवीरांवर होणाऱ्या क्षमापत्रांच्या आरोपाचे सप्रमाण खंडन करणारे अक्षय जोग यांचे नवे पुस्तक

‘पंजाब लोक काँग्रेस’सह कॅप्टन मैदानात

फडके रोड राहणार सुना सुना, जमावबंदी लागू

हा दौरा संपवून आपला परतीचा प्रवास सुरू करण्याआधी पंतप्रधानांनी ग्लास्गो येथील भारतीय समुदायाची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी मनू खजूरिया नावाची एक महिला पंतप्रधानांना भेटली. ग्लास्गोमध्ये वास्तव्याला असणारी ही महिला मुळची जम्मूची रहिवासी आहे. त्यामुळे पंतप्रधाना मोदींना भेटल्यावर त्यांनी मोदींचे आभार मानले. कलम ३७० आणि ३५ अ हटवण्यासाठी त्यांनी पंतप्रधान मोदींप्रती कृतज्ञता व्यक्त केली. हे अन्यायकारक कलम नष्ट केल्याने जम्मू काश्मीर मधील महिलांना समान दर्जा मिळाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ट्विटरवर पंतप्रधान मोदींसोबतचा फोटो ट्विट करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या वेळी पंतप्रधान मोदींनी लहान मुलांशी छान गप्पा मारल्या. तर ढोल वादनाचाही मनमुराद आनंद लुटला. पंतप्रधान मोदींना भेटल्याचा आनंद ग्लास्गो येथील भारतीयांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

Exit mobile version