तीन कोटी द्या, मग मिळेल नवाब मालिकांना जामीन!

तीन कोटी द्या, मग मिळेल नवाब मालिकांना जामीन!

मनी लाँड्रिंग प्रकरणात अनेक दिवसांपासून महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक तुरुंगात आहेत. नवाब मलिक यांचा मुलगा त्यांच्या जामिनासाठी प्रयत्न करत असून त्याने एक धक्कादायक खुलासा केला आहे. वडिलांना जामीन मिळवून देण्यासाठी कोणीतरी त्यांच्याकडे तीन कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी नवाब मलिक यांचा मुलगा अमीर मलिक याने भावे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

अमीर मलिकच्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणूक आणि आयटी कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अमीर मलिकच्या म्हणण्यानुसार, त्यांना इम्तियाज नावाच्या व्यक्तीचा ईमेल आला होता, ज्यामध्ये त्याने लिहिले होते की ते राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना जामीन देण्याचा प्रयत्न करतील. त्या बदल्यात त्यांना तीन कोटी रुपयांचे बिटकॉइन हवे आहेत. नवाब मलिक यांना गेल्या महिन्यात ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती, तेथून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

अमीर मलिक यांच्या फिर्यादीवरून बुधवारी रात्री भावे नगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमिर मलिक यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘मी या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे, परंतु ही गुप्त बाब असल्याने मी अधिक माहिती देऊ शकत नाही’.तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आयपीसी कलम ४१९, ४२० आणि आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

हे ही वाचा:

हिजाब प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आज मुस्लीम संघटनांचा ‘कर्नाटक बंद’

गोव्यामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी प्रमोद सावंत यांच्यावर विश्वास

सीताराम कुंटेंची हकालपट्टी करा

अभिषेक बॅनर्जी यांना ईडीची नोटीस

मंत्री नवाब मलिक यांना ईडीने २३ फेब्रुवारी रोजी मनीलाँडरिंग कायद्यांतर्गत अटक केली होती. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित लोकांसोबत मालमत्तेचा व्यवहार केल्याचा आरोप मालिकांवर आहे. नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत असून ते मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहेत.

Exit mobile version