काँग्रेसचे जेष्ठ दिग्गज नेते गांधी घराण्याविरोधात आवाज उठवत आहेत. काही नेते G23 च्या बॅनरखाली आवाज उठवत आहेत, तर काही नेतृत्वावर सातत्याने टीका करत आहेत. काँग्रेसचे नेते पी.जे. कुरियन यांनी एक मागणी केली आहे. त्यांनी गांधी कुटुंब सोडून अन्य कुणाकडेही काँग्रेसचे नेतृत्व देण्याचे आवाहन केले आहे. केरळमधील वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्व क्षमतेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
एका मल्याळम मासिकाशी झालेल्या संवादात कुरियन म्हणाले की, गांधी घराण्याबाहेरील कोणाला तरी पक्षाची धुरा मिळाली पाहिजे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या क्षमतेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कुरियन म्हणाले की, जहाजाचा कप्तान अडचणीच्या वेळी जहाज सोडत नाही. मात्र २०१९ च्या निवडणुकीनंतर राहुल यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. जेव्हा पक्षाला त्याची सर्वाधिक गरज होती. जहाजाचा कप्तान अडचणीत साथ देतो. पण तो राहुल गांधींसारखा जहाजाला संकटात सोडून जात नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
सुपरस्टार आर. माधवनच्या मुलाने असं काय करून दाखवलं?
ईडीकडून ‘ऍमवे’ कंपनीची ७५७ कोटींची मालमत्ता जप्त
थकबाकी असतानाही कोल इंडियाने केली राज्याच्या कोळसा पुरवठ्यात वाढ
ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नवजात मुलाचा मृत्यू ; मुलगी सुखरूप
पुढे कुरियन म्हणाले की, अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊनही राहुल पक्षाचे महत्त्वाचे निर्णय घेत आहेत. राहुल गांधींना राजकारणाचा फारसा अनुभव नसलेल्या गुंडांनी घेरल्याचा कुरियन यांनी आरोप केला आहे. राहुल गांधी हे स्थिर नसलेले नेते आहेत, असेही ते म्हणालेत. त्यांना यापुढे कोणतीही जबाबदारी देता येणार नाही. राहुल आपल्या जवळच्या नेत्यांशी सल्लामसलत करून अनेक निर्णय घेतात. पक्ष अशा प्रकारे पुढे जाऊ शकत नाही.
दरम्यान, पाच राज्याच्या निवडणुकीच्या दारुण पराभवानंतर पक्षात पराभवाचे मंथन सुरु झाले. मात्र पक्षाची नव्याने बांधणी सुरु असताना सध्याही राहुल गांधी परदेशी दौऱ्यावर गेले आहेत.