ठाकरे सरकारने लस खरेदीची वाचलेली रक्कम शेतकऱ्यांना द्यावी

ठाकरे सरकारने लस खरेदीची वाचलेली रक्कम शेतकऱ्यांना द्यावी

ठाकरे सरकारने लस खरेदीची वाचलेली रक्कम शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी राज्याचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लस खरेदी करता चेक लिहून तयार ठेवला होता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना मोफत लस देऊन तो भार कमी केला आहे. त्यामुळे ती रक्कम आता राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी अनिल बोंडे यांनी केली आहे.

महाराष्ट्र राज्याचे माजी कृषिमंत्री आणि भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ.अनिल बोंडे यांनी शनिवार १२ जून रोजी लातूर येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बोंडे यांनी लातूर मधील शेतकऱ्यांच्या पिक विम्याच्या प्रश्नाला धरून काही प्रमुख मागण्या राज्य सरकारकडे केल्या आहेत. लातूर विभागात एकूण ३९ लाख ४९ हजार शेतकरी आहेत. पण यापैकी फक्त ७ लाख ३८ हजार शेतकऱ्यांनाच पिक विम्याचा लाभ घ्यायचा आहे. अशी माहिती बोंडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तर दुसरीकडे विमा कंपनीला मात्र १८१७ कोटी रुपये नफा प्राप्त झाला आहे असा धक्कादायक खुलासा अनिल बोंडे यांनी केला. त्यामुळे लातूर मधील शेतकऱ्यांना तातडीने विम्याची रक्कम देण्यात यावी अशी मागणी अनिल बोंडे यांनी केली आहे.

७ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना द्या
शेतकऱ्यांना ७ हजार कोटी रुपये देण्याची मागणी अनिल बोंडे यांनी केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड लस खरेदी करण्यासाठी ७ हजार कोटी रुपयांचा चेक लिहून ठेवला होता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना मोफत लस देऊ केल्यामुळे त्यांचे ते पैसे वाचले आहेत. त्यामुळे हे वाचलेले ७ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना देऊ करावेत अशी मागणी बोंडे यांनी केली आहे.

Exit mobile version