टिपू सुलतान मुद्द्यावरून आमदार अमित साटम यांचा महापौरांना इशारा
गोवंडी येथील एका रस्त्याला टिपू सुलतान नाव देण्यास भाजपानेच २०१३मध्ये पाठिंबा दिला होता, हा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलेला आरोप खोडसाळ आणि धडधडीत खोटा असल्याची टीका भाजपाचे आमदार अमित साटम यांनी केली आहे. आपण त्यावेळी नगरसेवक असताना स्थापत्य समिती उपनगरचा सदस्यही नव्हतो. त्यामुळे आपण या टिपू सुलतान नावासाठी अनुमोदन दिले होते, असे पत्र आपल्याकडे असेल तर ते महाराष्ट्रासमोर आणा. अन्यथा ५० कोटींचा दावा ठोकू, असा इशाराही साटम यांनी दिला आहे.
गोवंडी येथील उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यात यावे, या समाजवादी पक्षाच्या नगरसेविकेच्या प्रस्तावाला शिवसेनेचा छुपा पाठिंबा असल्याच्या वृत्तानंतर महापौरांनी भाजपावर आरोप केले होते. पण अमित साटम यांनी व्हीडिओद्वारे महापौरांना आव्हान दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी गोवंडीतील रस्त्याला टिपू सुलतान नाव देण्यास मी अनुमोदन दिल्याचे पत्र आपण महाराष्ट्रासमोर सात दिवसांत आणावे. नाहीतर मी पोलिसात तक्रार करीन आणि अब्रुनुकसानीचा ५० कोटींचा दावाही आपल्यावर ठोकीन.
साटम यांनी असेही म्हटले आहे की, रस्त्याला टिपू सुलतानचे नाव देण्यासाठी आपण माझे नाव बनावट कागदपत्रांच्या आधारे रेटत आहात.
हे ही वाचा:
गर्दीसाठीही आता केंद्रच जबाबदार?
विकिपीडियावर विश्वास ठेवू नका…साईटवर डाव्यांचा कब्जा
टाळेबंदीमध्ये वाढले मुलींमध्ये बालविवाहाचे प्रमाण
कुरारची कारवाई, ठाकरे सरकारचा अत्याचारी चेहरा दाखवणारी…
समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रुक्साना नाझिम सिद्दीकी यांनी गोवंडी येथील उद्यानास टिपू सुलतान उद्यान हे नाव ठेवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्या प्रस्तावास भाजपाने कडाडून विरोध केला. पण या प्रस्तावाला विरोध न करता उलट तो प्रस्ताव आयुक्तांकडे फेरविचारार्थ पाठविण्यात आल्यामुळे शिवसेनेचा या प्रस्तावाला छुपा पाठिंबा आहे, असा आरोप भाजपाने केला.
भारतीय जनता पार्टीकडून सुरुवातीपासूनच या प्रस्तावाला कडाडून विरोध करण्यात आला. टिपू हा धर्मांध, क्रूरकर्मा, जुलमी अत्याचारी आणि हिंदू द्वेष्टा राजा होता. टिपूने म्हैसूर राज्याला मुस्लीम राष्ट्र घोषित केले होते. त्यासोबतच त्यांनी राज्यातील सर्व हिंदूंचे धर्मांतर करून त्यांना मुस्लिम करण्याची घोषणाही केली होती. सरकारने आपल्या कारकिर्दीत लाखो मुलींची कत्तल करुन मंदिरांचा विध्वंस केला होता. यासोबतच त्याने स्त्रियांवर अत्याचार केल्याच्याही घटना आहेत. असा राजा योग्य आणि महान शासक कसा असू शकतो? असा सवाल भाजपाकडून विचारण्यात आला आहे.