व्यापाऱ्यांच्या संयमाचा कडेलोट; १ जूनपासून शटर उघडणारच

व्यापाऱ्यांच्या संयमाचा कडेलोट; १ जूनपासून शटर उघडणारच

राज्यभर लागलेल्या लॉकडाउनमुळे व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान होत असून हे नुकसान आता सहन करण्यापलीकडे गेले आहे. व्यापाऱ्यांचे तब्बल ४० हजार कोटींचे नुकसान झाले असून त्यावर कोणताही तोडगा निघताना दिसत नाही. त्यामुळे येत्या १ जूनपासून सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू करून सरकारच्या आडमुठेपणाला चोख प्रत्युत्तर देण्याचा निश्चय केला आहे. भाजपाच्या मुंबई व्यापारी सेल व इंडस्ट्रीज सेलने आता ऑनलाइन याचिका करून त्यावर सर्व व्यापाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जाणार आहेत.

हे ही वाचा:

डॉ. जयंत नारळीकर उलगडणार ‘सावरकरांची विज्ञाननिष्ठा’

बारावी परीक्षेवरून विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

आरेच्या!! सीईओच्या घरात सापडली साडेतीन कोटीची बेहिशोबी रोकड 

सुशील कुमारचे नोकरीतून निलंबन

लॉकडाउनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवून बाकीची दुकाने मात्र बंद आहेत. अशा परिस्थितीत या दुकानांमध्ये काम करणाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पोटापाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. जवळपास १३ लाख दुकाने या लॉकडाउनमध्ये बंद आहेत आणि ५५ लाख कर्मचारी रोजगाराविना आहेत. तब्बल २ कोटी लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय, कोट्यवधी रुपयांचा फटकाही दुकानमालकांना बसला आहे. त्यामुळे आता या दुकानांवरील लॉकडाउन उठवा आणि त्यांना व्यवसाय करण्याची परवानगी द्या. अन्यथा, १ जूनपासून सगळे नियम पाळून सगळ्या दुकानांची शटर्स उघडली जातील, असा इशारा देण्यात आला आहे.

भाजपाच्या या सेलने मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापार प्रकोष्ठ अध्यक्ष जयेश जरीवाला, इंडस्ट्री सेलचे शंकर भानुशाली, अभियान टीमचे सचिव प्रतीक कर्पे यांनी ऑन लाईन याचिकेच्या माध्यमातून व्यापाऱ्यांचा हा प्रश्न तडीस नेण्याचा निश्चय केला आहे.

Exit mobile version