23 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरराजकारणपायी वारीसाठी बायोबबल नियमांनुसार, परवानगी द्या

पायी वारीसाठी बायोबबल नियमांनुसार, परवानगी द्या

Google News Follow

Related

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून यंदाच्या पायी आषाढी वारीला बायो बबल नियमांनुसार, परवानगी मिळावी, अशी मागणी केली आहे. एकीकडे वारकरी संप्रदाय पायी वारी आणण्यावर ठाम आहे. तर दुसरीकडे आळंदी किंवा पालखी मार्गातील इतर काही गावातील ग्रामस्थांनी पायी वारी नको, असा आग्रह धरला आहे. दरम्यानच्या काळात वारकरी संप्रदायानं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पायी वारीसाठी बायोबबल नियमांनुसार, परवानगी द्या, अशी मागणी करणारं पत्र लिहिलं आहे.

कोरोनाचे वाढते संकट, रोज सापडणारे नवनवीन स्ट्रेन, तिसऱ्या लाटेचा दिलेला इशारा अशा परिस्थितीत आषाढी पायी वारीला नागरिक आणि प्रशासनाकडून टोकाचा विरोध सुरु झाला आहे. अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बायोबबलमध्ये पायी वारीला परवानगी देण्याचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. गेल्यावर्षी पेक्षा यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठी मनुष्यहानी झाली आहे. अजूनही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडण्याचे सत्र सुरु आहे. अशावेळी यंदाही गेल्यावर्षी प्रमाणे आषाढी यात्रेला येणारे पालखी सोहळे बसमधून आणण्याची मागणी पंढरपूर, आळंदी येथील नागरिकांसह पालखी मार्गावरील गावातील ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनानेही यंदा पायी वारीबाबत ठाम आणि कठोर भूमिका घेत पायी वारील विरोध केला आहे. मात्र वारकरी संप्रदाय पायी वारीसाठी ठाम असल्याचे चित्र आहे. वास्तविक वारकरी संप्रदायाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाही पायी वारी संदर्भात मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालखी सोहळा आणि देवस्थान प्रतिनिधींशी बैठकीत चर्चा करून पायी वारीचे धोके संप्रदायाला दाखवून दिले आहेत. असे असताना वारकरी संप्रदायाने मग विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुन्हा पायी वारीची मागणी केली होती.

वारकरी संप्रदायाने मुक्काम कमी करायची आणि कोरोनाचे नियम पाळत अत्यंत मर्यादित संख्येने पायी वारी करण्याची तयारी दर्शवत पायी वारीसाठी शासनाकडून परवानगी मिळवून देण्याची मागणी देवेंद्र फडणवीसांकडे केली होती. यामध्ये मर्यादित वारकरी संख्येत, पालखी मुक्कामाची स्थळे कमी करून आणि त्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची तयारी असल्याचे वारकऱ्यांनी सांगत बायोबबलसह विविध प्रस्ताव दिले आहेत. याशिवाय गरज भासल्यास श्रींच्या पादुका आणि पालखी रथ ऐवजी बंदिस्त वाहनातून नेण्याची तयारी दाखवली होती. आता देवेंद्र फडणवीस यांनी पालखी सोहळा हा महाराष्ट्राची प्राचीन परंपरा असून एका अत्युच्च अध्यात्मिक सोहळ्याची अनुभूती देणारा क्षण आहे. वारी वारकरी संप्रदायाचा प्राण आहे. अशा पायी वारीला जैव सुरक्षा (बायोबबल) कवचामध्ये सोहळा पार पडण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

हे ही वाचा :

कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

आम्ही जंगलातल्या वाघाशी मैत्री करतो, पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही

… की महानगरपालिकेला आणखीन बळी हवे आहेत?

प्रशांत किशोर-शरद पवार भेट आज सिल्वर ओकवर

विरोधी पक्षनेत्यांना राज्यातील कोरोनाची सद्य परिस्थिती आणि धोका माहीत आहे. यातच पंढरपूरमध्ये नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीमुळे झालेली भीषण अवस्था देखील त्यांना माहीत असताना पुन्हा पायी वारीला परवानगी मागितल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. अशा मागणीमुळे अजून किती नागरिकांचे प्राण धोक्यात घालायचे, याचा विचार संयमी आणि अभ्यासू विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करावा अशी अपेक्षा आळंदी , पालखी मार्गावरील गावे आणि पंढरपूरकरांनी करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा