‘मला मृत्यू द्या’ सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

‘मला मृत्यू द्या’ सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लाचखोरी प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांचा एक व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सुजाता पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना ‘मला मृत्यू द्या’ अशी विनंती केली आहे. या लाचखोरी प्रकरणात कसे फसवण्यात आले, त्यांच्या कुटुंबाला त्रास दिला जात असल्याचे त्यांनी या व्हिडीओमध्ये सांगितले आहे.

सुजाता पाटील यांनी मागील अडीच महिन्यांपासून राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस आयुक्त, गृहविभाग आणि पोलीस महासंचालक यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. तेव्हा त्यांनी माझ्यावर अन्याय झाला असून मला खोट्या प्रकरणात अडकवून माझे करियर संपवण्याचा प्रयत्न काही पोलीस अधिकारी आणि आरटीआय कार्यकर्ते करत असल्याचे सांगितले होते. मात्र, अडीच महिने उलटूनही पाटील यांच्या पत्रव्यवहाराची कुठलीही दखल न घेतल्याने अखेर सुजाता पाटील यांनी त्यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमावर पोस्ट केला आहे.

हे ही वाचा:

‘योगी त्यांच्या मठात जातील आणि मोदी डोंगरावर जातील तेव्हा तुम्हाला कोण वाचवेल’ ओवेसी बरळले

हरभजन सिंगचे क्रिकेटला अलविदा

तुकाराम सुपेंच्या घरातील घबाड संपेना; ३३ लाख जप्त

‘समाजवादी अत्तर’ बनवणाऱ्या उद्योजकांवर आयकर विभागाची धाड! सापडले १५० कोटी रुपये

या व्हिडिओमध्ये सुजाता पाटील यांनी त्यांना कसे फसवण्यात आले, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कसे छळण्यात आले, याबाबत वक्तव्य केले आहे. कोर्ट कचेऱ्या करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही, त्यापेक्षा मला मृत्यू द्या, असे पाटील यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, सहपोलिस आयुक्त, पोलिस महासंचालक यांना उद्देशून म्हटले आहे.

मेघवाडी विभागाच्या तत्कालीन सहाय्यक पोलिस आयुक्त असणाऱ्या सुजाता पाटील यांना ८ ऑक्टोबर २०२१ रोजी ४० हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्यानंतर सुजाता पाटील यांना निलंबित करण्यात आले असून सध्या त्या जामिनावर आहेत. निलंबनाच्या कालावधीत त्यांना नायगाव सशस्त्र विभागात पाठवण्यात आले आहे.

Exit mobile version