24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणआदित्यजी, अजित दादांकडे राज्याचं नेतृत्व द्या

आदित्यजी, अजित दादांकडे राज्याचं नेतृत्व द्या

Google News Follow

Related

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा पाचवा आणि शेवटचा दिवस धुमश्चक्रीयुक्त ठरला. विरोधकांकडून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. पण भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या सूचनेकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं. संपूर्ण अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तब्येत बारी नसल्याचे कारण सांगून विधीमंडळामध्ये येऊ शकले नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखाली अधिवेशनाचं कामकाज अत्यंत चांगलं झालं, या काळात अनेक विषयांना न्याय मिळाला. म्हणून अधिवेशनाच्या काळात अजित पवारांकडे नेतृत्व द्यावं आणि इतर वेळी उद्धव ठाकरेंनी नेतृत्व करावं अशी सूचना मुनगंटीवारांनी राज्याचे मंत्री आदित्य ठाकरेंना केली.

ही सूचना म्हणजे अजित पवारांच्या कार्यशैलीचे कौतुक की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर शंका होती अशी चर्चा सगळीकडे सुरु आहे. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “या वेळचं अधिवेशन पाचच दिवस झालं. पण या काळात अजितदादांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्तम काम झालं. मी आदित्य ठाकरेंना सूचना करतो की अधिवेशन काळात सरकारचं नेतृत्व अजितदादांकडे द्या, इतर वेळी नेतृत्व बाबांकडे (उद्धव ठाकरे) द्या. कारण हे कामकाज तरी होऊ शकलं. अनेक विषय मार्गी लागले. अनेक विषयांना न्याय मिळाला.”

आता सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वक्तव्यावरुन एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचं बोललं जातंय. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यशैलीचं कौतुक करत त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. तर दुसरीकडे अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर शंका व्यक्त केली.

हे ही वाचा:

चीनने लाखो नागरिकांना लोटले लॉकडाऊनमध्ये

काय आहे पंतप्रधान मोदींच्या नव्या गाडीची खासियत?

दिनेश मोंगियाचा भाजपात प्रवेश

मोदी सरकारच्या योजनेला यश, चीनला डावलून इंटेल भारतात

राज्याच्या अधिवेशनाचा काळ हा अत्यंत महत्वाचा असून या काळात महत्त्वाच्या अनेक विषयांवर चर्चा केली जाते, अनेक विषय मार्गी लावले जातात. नेमक्या अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्र्यांची तब्येत व्यवस्थित नसल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत. या काळात मुख्यमंत्रीपदाचा पदभार दुसऱ्या कोणाकडे द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली. पण तसंही घडलं नाही. पण विरोधकांच्या अनेक प्रश्नांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नेमकी उत्तरं दिली आणि आपल्या कार्यशैलीची, नेतृत्वाची चुणूक दाखवली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा