कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार, यावर अद्याप शिक्कामोर्तब झाले नसतानाच वक्फ बोर्डाच्या प्रमुखांनी उपमुख्यमंत्रिपद मुस्लिम व्यक्तीला देण्याची मागणी केली आहे. तसेच, पाच मुस्लिम आमदारांना गृह, महसूल, आरोग्य आणि अन्य महत्त्वाची खाती द्यावी, असेही त्यांचे म्हणणे आहे.
सुन्नी उल्मा बोर्डाच्या मुस्लिम नेत्यांनी आपल्या या मागण्या जाहीरपणे मांडल्या. ‘आम्ही निवडणुकीपूर्वीच कर्नाटकचा उपमुख्यमंत्री मुस्लिम हवा, अशी मागणी केली होती. तसेच, आम्ही ३० जागा मागितल्या होत्या. परंतु आम्हाला १५ जागा मिळाल्या, त्यातील नऊ जागांवरील मुस्लिम उमेदवार जिंकून आले. सुमारे ७२ मतदारसंघात काँग्रेस केवळ मुस्लिम मतदारांमुळे विजयी झाली आहे. आम्ही एक समाज म्हणून काँग्रेसला बरेच काही दिले आहे. आता त्या बदल्यात काही तरी देण्याची वेळ आली आहे. आम्हाला मुस्लिम उपमुख्यमंत्री हवा असून गृह, महसूल आणि शिक्षण यांसारखी महत्त्वाची खाती हवी आहेत. आमचे आभार मानण्याची जबाबदारी काँग्रेसची आहे. या मागण्यांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी सुन्नी बोर्ड लवकरच तातडीची बैठक बोलावणार आहे,’ अशी माहिती वक्फ बोर्डाचे प्रमुख शफी सदी यांनी दिली.
हेही वाचा :
आता ९२८ संरक्षण उत्पादनांची निर्मिती होणार भारतात
‘मी देशभक्त असण्याची शिक्षा भोगतोय’
कर्नाटकमध्ये काँग्रेसला पूर्ण बहुमत; भाजपाची हार, जनता दलानेही गमावला विश्वास
द केरळ स्टोरी’ यांसारख्या चित्रपटांवर बंदी घालण्याची प्रथा जुनीच !
ते मंत्री कोण असतील, हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही. कोणता उमेदवार योग्य आहे, ते काँग्रेस ठरवेल, असे त्यांनी सांगितले. ‘खरे तर कर्नाटकचा मुख्यमंत्री हा मुस्लिम हवा. कर्नाटकच्या इतिहासात असे अद्याप घडलेले नाही. राज्यात ९० लाख लोक मुस्लिम आहेत. आम्ही अनुसूचित जाती वगळता सर्वांत मोठा अल्पसंख्याक समाज आहोत. आम्हाला आमच्या मागणीनुसार, ३० हून अधिक जागा मिळाल्या नाहीत. मात्र एस एम कृष्णा यांच्या कार्यकाळात मिळालेली तशी किमान पाच खाती आणि उपमुख्यमंत्रिपद मिळावे, अशी आमची मागणी आहे,’ असे ते म्हणाले.