महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक झाल्यानंतर दणदणीत बहुमताने आलेल्या महायुतीचा शपथविधी ५ डिसेंबरला होत आहे. यानिमित्ताने महायुतीत नाराजी असल्याच्या वावड्या उडविल्या जात आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्यांचा महापूर आला आहे. त्यातच भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी ठाण्यातील एकनाथ शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांच्या तब्येतीचा विचारपूस केली आणि असा कोणताही दुरावा महायुतीत नाही, शिंदे नाराज नाहीत, याची स्पष्टोक्ती महाजन यांनी केली.
महाजन म्हणाले की, माझी गृहमंत्री पदाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. हा सगळा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. त्याबाबतीत आम्ही एक शब्दही बोललो नाही. कोणतं खातं कुणाला पाहिजे, याबाबत आमच्यात चर्चा झालेली नाही. मी फक्त एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. त्यांच्या हाताला अजूनही सलाईन लागलेली आहे. आम्ही सर्व एकत्र आहोत. आमच्यात कुठेही दुरावा नाही. तुम्हाला आम्ही सर्व एकत्र दिसू. आमच्या 5 तारखेचा शपथविधीचा कार्यक्रम अतिशय दिमाखदार होईल. आमच्यात कोणतंही मतमतांतर नाही. मी एकनाथ शिंदे यांना ३० वर्षांपासून ओळखतो. त्यामुळे छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी रुसले आहेत, रागावले आहेत, चिडले आहेत, असं अजिबात होणार नाही”, असंही गिरीश महाजन यावेळी म्हणाले.
हे ही वाचा:
मेट्रिमोनियल वेबसाईटवर राहुल नाव सांगून मोहम्मद हुसैनने तरुणीवर केले लैंगिक अत्याचार
पंतप्रधान मोदींच्या आमंत्रणावरून २०२५ मध्ये पुतीन करणार भारत दौरा!
मालेगाव व्होट जिहाद घोटाळा: २१ बँक खात्यांमधून ८०० कोटींचे व्यवहार
महाजन यांनी सांगितले की, “गेल्या पाच-सहा दिवासांपासून आमचे नेते एकनाथ शिंदे यांची तब्येत खराब होती. त्यांना घशाचा त्रास आहे. त्यामुळे तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी इथे आलो होतो. खरंतर मी तीन-चार दिवसांपूर्वीच त्यांच्या भेटीची वेळ मागितली होती. पण ते गावी निघून गेले. त्यानंतर माझा त्यांच्याशी संपर्क झाला नाही. पण आज मी मुद्दामून एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो.
“युतीमध्ये सर्व आलबेल आहे. सर्व व्यवस्थित आहे. आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाहीत. तीन दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन अगदी स्पष्टच सांगितलेलं आहे. त्यामुळे मला काही नवीन सांगण्याची गरज नाही. कुठेही मतभेद नाहीत. आमची 5 तारखेची तयारी सुरु आहे”, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.