राऊतांच्या डोळ्यांवर हिंदुत्वविरोधी बिंदू”,

महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजनांचं राऊतांना प्रत्युत्तर

राऊतांच्या डोळ्यांवर हिंदुत्वविरोधी बिंदू”,

मुंबईत रविवारी ‘हिंदू समाजा’च्या वतीने ‘जन आक्रोश मोर्चा’चं आयोजन करण्यात आलं होतं. ‘लव्ह जिहाद’, ‘धर्मांतरण’ आणि ‘लॅण्ड जिहाद’ या विरोधात कायदे करण्यासाठी या मोर्चाचे आयोजन केले होते.यावर राऊतांनी भाजपवर हल्ला बोल केला आहे.याबाबत  प्रसारमाध्यमांशी बोलताना महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री  गिरीश महाजन म्हणाले की, “संजय राऊतांच्या डोळ्यांचं ऑपरेशन करावं लागणार आहे. मोतीबिंदूसारखा त्यांच्या डोळ्यांवर हिंदुत्वविरोधी बिंदू आला आहे”.

राहुल गांधींबरोबर ते काश्मीरमध्ये फिरतात. संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंच्या सेनेने हिंदूत्वापासून फारकत घेतली असून आता त्यांना हिंदू शब्दाचीसुद्धा अ‍ॅलर्जी झाली आहे. राऊत हे नैराश्यातून अशी वक्तव्य करत आहेत असे महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री  गिरीश महाजन म्हणाले ”याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्यावर भाजपाने मोर्चे काढले नाहीत? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला होता त्यावर विचारले असताना महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजनांनी सांगितलं, “याला कोणताही अर्थ नाही. अनेक जणांच्या तोंडून असे शब्द निघाले आहेत. भाजपा त्यांचं समर्थन करत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सर्वांनाच आदर आहे.”असे महाजन पुढे म्हणाले.

 

हे ही वाचा: 

४०० कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी अमर मूलचंदानी ईडीच्या ताब्यात

भारत हि लोकशाहीची जननी आहे

शिवाजी पार्कवर हिंदू .. आझाद मैदानात लिंगायत समाज आक्रमक

शिवाजी पार्कवर हिंदू जनआक्रोश मोर्चासाठी हिंदू समाज एकवटला

“संजय राऊत हिंदूत्वाबरोबर फारकत घेऊन गळ्यात गळे घालून कोणसोबत फिरतायत हे सर्वांना दिसत आहे. वेळ प्रसंगी एमआयएमबरोबर सुद्धा ते जाऊन बसले आहेत. त्यांच्याकडे आमदार, खासदार आणि शिवसैनिकही राहिले नाहीत. ते सगळे एकनाथ शिंदेच्या गटात सामील झाले आहेत. त्यामुळे संजय राऊत वैफल्यग्रस्त झाले असून, नैराश्यातून पाहिजे ते बोलत आहेत,” असा टोला गिरीश महाजनांनी लगावला.

राऊत काय म्हणाले.

केंद्रात आठ वर्षांपासून हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह हे दोन्ही प्रबळ आणि शक्तीमान नेते आहेत. तरीही ‘धर्मांतरण’ आणि ‘लव्ह जिहाद’सारखे विषय घडत असतील, तर हे त्या सरकारचं अपयश आहे, अशी टीका संजय राऊतांनी भाजपावर केली आहे

Exit mobile version