27 C
Mumbai
Monday, December 30, 2024
घरराजकारण४० आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडायचे हे सोपे काम नव्हते

४० आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडायचे हे सोपे काम नव्हते

गिरीश महाजन यांनी सांगितली कहाणी

Google News Follow

Related

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर दोन गट तयार झाले. शिंदेसह ४० ते ५० आमदारांनी वेगळा गट स्थापन केला. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळलं. भाजप आणि शिंदे गटाचं सरकार आले.अशातच शिवसेनेतील या बंडामागे भाजपचाच हात असल्याचे बोलले जाते. त्यातच भाजपच्या एका मोठ्या नेत्यान याची कबुली दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत.

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील लोहारी येथे अखिल भारतीय बडगुजर समाजाचं महाअधिवेशन झाले. या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना मंत्री गिरीश महाजन बोलत होते ,या कार्यक्रमाला त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गुलाबराव पाटीलहि उपस्थित होते. याच कार्यक्रमांत महाजन यांनी शिवसेनेत फूट पाडण्याचा भाजपचाच डाव असल्याची कबुली दिली आहे. शिवसेनेचे दोन गट होण्यामागे भाजपचाच डाव असल्याची कबुलीही त्यांनी दिली.

“कदम कदम पे ऊरजो जबान देता है, हर बला से मुझको बचा लेता है, पता नहीं कीसकी दुवाओ फैज है मुजपर, डूबने लगता हु, तो दरिया उछाल देता है”अशी शायरी ऐकवत त्यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर कसे विराजमान झाले ते सांगितले. एक लाट आली आणि शिंदेंना त्या लाटेमुळे मुख्यमंत्री पदावरच  बसवले. मंत्री गिरीश महाजन पुढे म्हणाले की, “एकनाथ शिंदे कसे मुख्यमंत्री झाले. या गोष्टीचा विचार केला तर आम्हालाही विश्वास बसत नव्हता. मात्र ऑपरेशन सुरू केलं. एकनाथजी पुढे गेले आणि बघता बघता त्यांचं सर्व सैन्य त्यांच्या मागे गेलं आणि शेवटी जमुनच आले सगळे.यामागे चामुंडा मातेचाही आशीर्वाद होता हे पण ते पुढे म्हणाले.

हे ही वाचा:

जयंत पाटीलही आता टोमणे मारून घालवत आहेत वेळ!

घुसखोर चीनला ‘तिरंगी हेल्मेट्स’ ची चपराक

समाजवादी पार्टीचा प्रवक्ता पत्रकारांच्या कुटुंबियांवरही आक्षेपार्ह टिप्पणी करत होता!

भूकंपाच्या धक्क्याने हिंगोली हादरले

शिवसेनेतून ४० लोक बाहेर पडतात,उद्धव ठाकरे याना कंटाळून हे लोक बाहेर पडतात. सतरा अठरा लोक घेऊन बाहेर पडायचे आणि पन्नासपर्यंत मजल मारायची हे सोप्पे काम नव्हते. मधेच मिशन फेल झाले तर काय करायच? असं वाटायच. पुढारी कसे असतात, तुम्हाला माहिती आहे का, आम्ही कसे असतो तुम्हाला माहिती आहे, असंही महाजन म्हणाले.

आधीच्या सरकारचा अडीच वर्षांचा कारभार बघितला, मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयाची पायरी सुद्धा कधी चढली नाही तर दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांना मी सांगतो किमान चार,पाच तास तरी झोपा ते रात्री तीन वाजेपर्यंत काम करतात असही महाजन म्हणाले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री रात्रंदिवस काम करत आहेत. महाराष्ट्रातील जनतेला खऱ्या अर्थाने ‘जाणता राजा’ आहे असे वाटत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा