‘चांगल्या कामासाठी हार्दिक शुभेच्छा’

इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन

‘चांगल्या कामासाठी हार्दिक शुभेच्छा’

इटालियन पंतप्रधान ज्योर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभा निवडणुकीत सलग तिसऱ्या निवडणुकीत मिळवलेल्या विजयाबद्दल अभिनंदन केले आणि दोन्ही देशांना एकत्र आणणारी मैत्री दृढ करण्यासाठी दोन्ही नेते एकत्र काम करतील, याची ग्वाही दिली.

‘दोन्ही राष्ट्रे विविध मुद्द्यांवर सहकार्य करतील जे दोन्ही राष्ट्रांना बांधील आहेत आणि लोकांच्या कल्याणासाठी आहेत,’ असेही त्या म्हणाल्या. ‘निवडणुकीतील विजयाबद्दल नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन आणि चांगल्या कामासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा. खात्री आहे की आम्ही इटली आणि भारताला एकत्र करणारी मैत्री मजबूत करण्यासाठी आणि आपल्या राष्ट्रासाठी व लोकांसाठी आम्हाला बांधील असलेल्या विविध मुद्द्यांवर सहकार्य मजबूत करण्यासाठी एकत्र काम करत राहू,’ असे मेलोनी यांनी ‘एक्स’वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

हे ही वाचा:

उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेशातील अंदाज चुकले

घोषणा  ‘४०० पार…’ची निकाल ३०० च्या आत… भाजपाचे गणित कुठे चुकले?

पुण्यात हरले मोरे-धंगेकर, जिंकले मुरलीधर!

अबब…अमित शहांचे लीड ७ लाखावर !

अन्य जागतिक नेत्यांनीही पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचे लोकसभा निवडणुकीत सलग तिसऱ्या विजयाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन केले. नेपाळचे पंतप्रधान प्रचंड, श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे आणि मॉरीशियाचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले.

Exit mobile version