पूर्वी मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना क्रूर मानायचो, पण त्यांनी माणुसकी दाखवली आहे असं विधान गुलाम नबी आझाद यांनी केलं आहे. काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी सोमवारी पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर हजेरी लावली आणि पक्ष सोडण्याबाबत प्रथमच विधान केले. ‘काश्मीरमध्ये गुजरातच्या बसवर हल्ला झाला, ती घटना मी विसरू शकत नाही. मी जम्मू-काश्मीरचा मुख्यमंत्री होतो आणि त्यांच्याशी फोनवर बोललो, असं गुलाम नबी आझाद एका घटनेचा संदर्भ देताना म्हणाले. काँग्रेसवर हल्लाबोल करताना आझाद यांनी, त्यांना पक्ष सोडण्यास भाग पाडले गेले आणि पक्षात खुशामत करणाऱ्यांना पदे दिली गेल्याचा आराेप केला.
गुजरातच्या घटनेबद्दल आझाद म्हणाले की, तेव्हा गुजरातच्या एका बसमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. मी तेव्हा मुख्यमंत्री होतो जम्मू काश्मीरचा. लोकांची अवस्था बघून मला रडू कोसळले. त्या जखमींना, मृतांना नेण्यासाठी मला विमाने मिळावीत अशी विनंती मी मोदींना केली. त्यांनी ती व्यवस्था केली. त्यामुळे राज्यसभेत माझ्यासंदर्भात भाषण करताना त्यांच्या डोळ्यात अश्रू होते.
घर सोडण्यास भाग पाडले
काँग्रेस सोडण्याच्या प्रश्नावर गुलाम नबी आझाद म्हणाले की, कोणाला स्वतः घर सोडायचे आहे? माझ्या कुटुंबीयांनी मला काँग्रेस पक्ष सोडण्यास भाग पाडले. ही व्यक्ती नको आहे असे जेव्हा घरच्यांना वाटते आणि आपण इथे परके समजले जातो तेव्हा इथून निघून जाणे हेच योग्य ठरते. मला सर्वात जास्त खेदाची गोष्ट म्हणजे खुशामत करणारे किंवा ट्विट करणाऱ्यांना पक्षात पदे मिळाली आहेत.
हे ही वाचा:
‘स्वातंत्र्यदिनानिमित्त सामुहिक शक्तीचे घडले दर्शन’
गृहमंत्री अमित शहा मुंबईत ‘या’ गणेशोत्सवाला भेट देणार
Twin Tower Demolition: काही सेकंदात कोसळले भ्रष्टाचाराचे टॉवर
…. पण नवाब मलिक आणि संजय राऊत बनू नका!
पक्षाने सूचनेचा विचार केला नाही
गुलाम नबी आझाद म्हणाले, ‘जे कोणी माझा डीएनए मोदींचा असल्याबद्दल बोलतात, त्यांनी आधी स्वत:कडे बघावे. मोदी हे निमित्त आहे. जी २३ चे पत्र लिहिल्यापासून त्याचा माझ्याशी वाद आहे. त्याला कोणीही पत्र लिहून प्रश्न विचारावा असे त्याला कधीच वाटत नव्हते. अनेक (काँग्रेस) बैठका झाल्या, पण एकही सूचना मान्य झाली नाही. जयराम रमेश यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना गुलाम नबी आझाद म्हणाले, ‘प्रथम त्यांनी त्यांचा डीएनए तपासली पाहिजे की ते कुठे आणि कोणत्या पक्षाचे आहेत. त्याचा डीएनए कोणत्या पक्षात आहे ते बघू दे. बाहेरच्या लोकांना काँग्रेसचा थांगपत्ता नाही. खुशामत आणि ट्विट करून ज्यांना पदे मिळवणाऱ्यांनी आराेप केले तर आम्हाला वाईट वाटते.