हा आहे गुलाम नबी आझाद यांचा नवा पक्ष

कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर जवळपास महिनाभरानंतर गुलाम नबी आझाद यांनी सोमवारी त्यांच्या नव्या पक्षाचे नाव जाहीर केले आहे.

हा आहे गुलाम नबी आझाद यांचा नवा पक्ष

गुलाम नबी आझाद यांनी आपल्या नव्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर जवळपास महिनाभरानंतर गुलाम नबी आझाद यांनी सोमवारी त्यांच्या नव्या पक्षाचे नाव जाहीर केले आहे. त्यांच्या पक्षाचे नाव ‘डेमोक्रेटिक आझाद पार्टी’ असे त्यांनी जाहीर केले आहे. जम्मूमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी नाव जाहीर केले आहे.

रविवारी गुलाम नबी आझाद हे तीन दिवसांच्या दौऱ्यावर जम्मूमध्ये गेले आहेत. त्यावेळी त्यांनी त्यांच्या नव्या पक्षाचे नावं जाहीर केले आहे. त्यांनी पक्षाचा अजेंडा आधीच स्पष्ट केला आहे. यामध्ये जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करणे, स्थानिक लोकांसाठी जमीन आणि नोकऱ्यांचे हक्क सुरक्षित करण्यासाठी संघर्ष सुरू ठेवणे समाविष्ट आहे. पक्षाची विचारधारा आपल्या नावासारखी असेल आणि सर्व धर्मनिरपेक्ष लोक त्यात सामील होतील, असे गुलाम नबी आझाद म्हणाले आहेत.

पुढे गुलाम नबी आझाद म्हणाले, माझ्या नवीन पक्षासाठी सुमारे एक हजार ५०० नावे आम्हाला उर्दू आणि संस्कृतमध्ये पाठवण्यात आली होती. हिंदी आणि उर्दूचे मिश्रण म्हणजे ‘हिंदुस्थानी’. हे नाव लोकशाही, शांततापूर्ण आणि स्वतंत्र असावे अशी आमची इच्छा होती. पक्षाची नोंदणी करणे हे आमचे प्राधान्य आहे. परंतु निवडणुका केव्हाही होऊ शकतात, संबंधित घडामोडी चालूच राहतील. गुलाब नबी आझाद यांनी जास्त तपशील दिलेली नाही.

हे ही वाचा:

नवरात्र २०२२ : महाराष्ट्रातील महिलांना मुख्यमंत्र्यांची विशेष भेट

भारतात चाइल्ड पोर्नोग्राफीविरोधात ‘ऑपरेशन मेघदूत’

बारावीनंतर विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना करता येणार नोकरी

नवरात्र २०२२: महाराष्ट्राचं शक्तीस्थळ तुळजापूर

२६ ऑगस्ट रोजी गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्याचवेळी त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये स्वत:चा राजकीय पक्ष काढणार असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान, मार्च २०२२ मध्ये गुलाम नबी आझाद यांना माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्याकडून पद्मभूषण पुरस्कार मिळाला. आझाद यांनी गेल्या महिन्यात काँग्रेससोबतचे त्यांचे पाच दशकांहून अधिक जुने संबंध तोडले होते.

Exit mobile version