तुमच्या आशीर्वादाने फोडू महापालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी

घाटकोपरच्या दहीहंडी उत्सवात किरीट सोमय्या यांनी दिले आव्हान

तुमच्या आशीर्वादाने फोडू महापालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी

राज्यात सगळीकडे दहीहंडीचा आनंद दिसून येत आहे. कोविडचे निर्बंध हटून तब्बल दोन वर्षांनंतर मनसोक्त हंड्या फोडायला मिळत असल्याने उत्साहाचं वातावरण आहे. सेलिब्रेटींपासून राजकीय नेत्यांपर्यंत सर्वच या सणात रंगून गेल्याचं बघायला मिळत आहे.चला माझ्या सोबत रामभाऊ, मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची दहीहंडी आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने फोडूया, बोल बजरंग बली की जय असं म्हणत भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हंडी फोडली आहे. किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर याचा व्हिडिओ शेअर केला असून तो व्हायरल झाला आहे.

तीन थर चढत सोमय्या यांनी दहीहंडी फोडल्यावर मुंबई महापालिकेच्या माफिया राजची हंडी फोडली असं म्हटलं आहे. दहीहंडीच्या निमित्तानं सोमय्या यांनी  मुंबई महानगरपालिका आपलं पुढचं लक्ष्य असल्याचं सूचक विधान केलं अाहे.

या व्हिडिओमध्ये घाटकोपर येथील दहीहंडी उत्सवात हजारो गोविंदा जमलेले दिसत आहेत. या गोविंदांच्या मधोमध तीन थरांची हंडी लागलेली आहे. एक गोविंदा हातात हंडी घेऊन उभा आहे. गोविंदा सोमय्या यांना थरावर चढून वर नेतात. सर्व गोविंदांना हात उंचावून अभिनंदन करत सोमय्या हंडी फोडताना बघायला मिळत आहेत. आजुबाजुला ढोल ताशे वाजत आहेत. हंडी फोडून झाल्यावर सोमय्या देखील उत्साहात ढोल वाजवताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये रंगमंचावर राम कदम दिसत आहेत. चला माझ्या सोबत रामभाऊ, मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची दहीहंडी आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने फोडूया, बोल बजरंग बली की जय असं म्हणत आपल्या भावना व्यक्त करताना सोमय्या दिसत आहेत. ढोल वाजवल्यानंतर सोमय्या यांनी जोशात डान्स केल्याचही दिसत आहे.

हे ही वाचा:

कसे करावे शिवलीलामृत पारायण ?

हरिहरेश्वर येथे अज्ञात बोट आणि एके ४७ सापडल्याने खळबळ

‘भाजपाच्या मतांवर निवडून यायचे आणि उगाच म्हणायचे आमचा गड’

रोहिंग्यांचा पुळका मोदींचा दणका

माफिया राज म्हणून ठाकरेंना टोचणी

किरीट सोमय्या यांनी अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या आरोपानंतर त्यापैकी अनेक नेते तुरुंगात आहेत. माफिया राजची हंडी फोडली असं म्हणत सोमय्या यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर यांच्यावर निशाणा साधला आहे. सोमय्या यांनी या आधीही उद्धव ठाकरे यांना माफिया असं संबोधलं होतं. त्यावेळी शिंदे सरकारमधील काही जणांनी नाराजीही व्यक्त केली होती. पण आता पुन्हा तोच शब्द वापरून सोमय्या यांनी ठाकरे यांना टोचणी दिली असल्याचं बोललं जात आहे. ढोल वाजवून मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार करणाऱ्यांचा ढोल वाजवणार असेही त्यांनी एक प्रकारे सूचित केल्याचं बोललं जात आहे.

 

Exit mobile version