स्वतःच्या बुडा खाली काय जळते आहे ते आधी बघा

स्वतःच्या बुडा खाली काय जळते आहे ते आधी बघा

“स्वतःच्या बुडा खाली काय जळते आहे ते आधी बघा.” असं म्हणत भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी आज अग्रलेख लिहून गुजरातच्या बदललेल्या मुख्यमंत्र्यावरुन टिपणी केली होती. त्यांच्या याच टीकेला आता नितेश राणे यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. आमच्या गुजरात मॉडेलवर बोलण्यापेक्षा मुंबई मॉडेलवर बोला, असा टोला त्यांनी राऊतांना लगावला आहे.

गुजरातचा मुख्यमंत्री का बदलाल हा आमच्या पक्षाचा विषय आहे. आमच्या गुजरात मॉडेलवर बोलण्यापेक्षा तुम्ही मुंबई मॉडेलवर बोला ना. तुम्ही भर कोरोनाकाळात आयुक्त परदेशी यांची बदली का केली? असा प्रतिप्रश्न नितेश राणे यांनी राऊत यांना विचारला. गुजरात मॉडेलपेक्षा मुंबई मॉडेलवर बोला ना, आयुक्त परदेशीची का बदली केली होती? मुंबई मॉडेलमध्ये इतके मृत्यू झालेलं आहेत. तुम्ही तुमच्या मुंबई मॉडेलवर बोलून जनतेच्या प्रश्नांची उत्तर द्या, असं नितेश राणे यांनी ट्विट करुन संजय राऊतांना डिवचलं आहे.

गुजरात राज्य जर विकास, प्रगतीच्या मार्गावर पुढे जात होते, तर मग अशा पद्धतीने रातोरात मुख्यमंत्री बदलाची वेळ का आली?, असा सवाल आजच्या सामना अग्रलेखातून विचारला आहे. कुठं काय बदलायचं हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. भाकरी ही फिरवावीच लागते, पण एखादे राज्य जेव्हा विकास किंवा प्रगतीचे ‘मॉडेल’ असल्याचे सांगितले जाते, तेथे अचानक नेतृत्वबदल घडवला की, मग लोकांच्या मनात शंका निर्माण होतात, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

हे ही वाचा:

अमेरिकेकडून तालिबानला ४४० कोटी रुपयांची मदत

खडकवासला धरण १००% भरले

रशियात घुसखोरीसाठी जिहादी सज्ज

संजय राऊतांचे अग्रलेख म्हणजे तालिबानी प्रवृत्तीचे उदाहरण

अनेक दिवसांपासून राणे-शिवसेना संघर्ष सुरु आहे. याच संघर्षातून राणेंना अटकेला सामोरं जावं लागलं. हे संपूर्ण प्रकरण देशात चर्चिलं गेलं. जनआशीर्वाद यात्रा संपली तशी राणेंती टीकेची भाषा देखील मवाळ झाली होती. आता राऊतांच्या अग्रलेखानंतर पुन्हा एकदा राणेंनी बाह्या सरसावल्या आहेत.

Exit mobile version