जिहादींपासून हिंदुत्व वाचविण्याचे डच खासदाराचे आवाहन

जिहादींपासून हिंदुत्व वाचविण्याचे डच खासदाराचे आवाहन

राजस्थानमधील उदयपूरमध्ये नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट करणाऱ्या कन्हैय्यालालची दोन मुस्लिम तरुणांनी निर्घृण हत्या केली आहे. कन्हैय्यालालच्या हत्येनंतर देशभरात शोक, संताप व्यक्त केला जात आहे. पार्टी फॉर फ्रीडमचे संस्थापक आणि नेदरलँडचे खासदार गीर्ट वाइल्डर्स यांनी उदयपूर हत्याकांडाचा तीव्र निषेध केला आहे.

उजव्या विचारसरणीचे नेते गीर्ट वाइल्डर्स यांनी कन्हैयाचा गळा चिरून त्याची हत्या हा सर्वात घृणास्पद गुन्हा असल्याचे म्हटले आहे. त्यांनी जिहाद्यांना हिंदुत्व वाचवण्याचे आवाहन केले आहे. गीर्ट वाइल्डर्स हे भाजपच्या माजी नेत्या नुपूर शर्मा यांचे समर्थक आहेत.

गीर्ट वाइल्डर्स यांनी ट्विटरद्वारे कन्हैय्यालालच्या हत्येचा निषेध केला आहे. भारताचा मित्र म्हणून सांगतो असे म्हणत गीर्ट यांनी ट्विटची सुरुवात केली आहे. ते म्हणाले, भारत असहिष्णुता सहन करणे थांबवा. जिहादी, दहशतवादी आणि कट्टरतावाद्यांपासून हिंदुत्वाचे रक्षण करा. इस्लामचे लांगूलचालन करू नका नाहीतर किंमत चुकवावी लागेल. हिंदूंना शंभर टक्के संरक्षण देणारा नेता हवा आहे. याआधी गीर्ट यांनी नुपूर शर्माच्या समर्थनार्थही ट्विट केले होते.

हे ही वाचा:

महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश

तारापूर एमआयडीसी प्लांटमध्ये भीषण आग

सरकारला आली जाग! औरंगाबादचे संभाजीनगर करणार

‘अल्ट न्यूज’चे सहसंस्थापक मोहम्मद जुबेर यांना अटक

नुपूर शर्माच्या समर्थनार्थ कन्हैय्यालाल यांनी सोशल मीडिया पोस्ट केली होती. त्या पोस्ट नंतर मंगळवार,२९ जूनला दिवसढवळ्या कन्हैय्यालालच्या दुकानात जाऊन त्याची हत्या करण्यात आली. कन्हैय्यालाल यांचे शीर धडावेगळे करून दोन मुस्लिमांनी निर्घृण हत्या केली. हल्लेखोरांनी घटनेनंतर सोशल मीडियावर पोस्ट टाकून हत्येची कबुली देखील दिली.

Exit mobile version