गौतम गंभीरचा राजकारणाला राम राम!

राजकीय कर्तव्यातून मुक्त करण्याची पक्षश्रेष्ठींना विनंती

गौतम गंभीरचा राजकारणाला राम राम!

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्लीतील भाजपा खासदार गौतम गंभीर याने राजकीय प्रवासाबादल मोठा निर्णय घेतला आहे. गौतम गंभीर याने राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना एक्सवर पोस्ट करून त्याने या संबंधित माहिती दिली आहे.

गौतम गंभीर याने एक्सवर लिहिले आहे की, “मी पक्षाध्यक्षांना विनंती केली आहे की मला माझ्या राजकीय कर्तव्यातून मुक्त करा जेणेकरून मी माझ्या आगामी क्रिकेट वचनबद्धतेवर लक्ष केंद्रित करू शकेन. मला जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधानांचे आणि गृहमंत्र्यांचे मनापासून आभार मानतो. जय हिंद!”

हे ही वाचा:

बेंगळुरूतील कॅफेमध्ये स्फोट; आयईडी स्फोटके पेरणारा सीसीटीव्हीमध्ये कैद

भाजपचा अँग्री यंग मॅन अण्णामलाई यांचे लोकसभेत आगमन होण्याची शक्यता

‘माझ्या आईचा फोन आला नसता तर…’

आसाराम बापू तुरुंगातच राहणार

क्रिकेटच्या मैदानावर आक्रमक खेळी आणि वृत्ती यासाठी गौतम गंभीर विशेष प्रसिद्ध होता. गौतम गंभीरने राजकारणातही दमदार पदार्पण केले. त्याने पक्षासाठी भव्य रोड शो केले तसेच प्रचंड मोर्चे काढले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गंभीरने पूर्व दिल्लीच्या जागेवर मोठा विजय नोंदवला होता. गंभीर पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरला आणि जिंकला होता. त्याने ३ लाख ९० हजारांच्या मोठ्या फरकाने काँग्रेस नेते अरविंदर सिंग लवली यांचा पराभव केला होता. २०१८ मध्ये गंभीरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. क्रिकेटमधील अनेक विषयांवर तो धाडसी वक्तव्ये करत असतो.

Exit mobile version