अदानीविरोधकांना हादरा, गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट

सिल्व्हर ओकवर दोन तास झाली चर्चा

अदानीविरोधकांना हादरा, गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट

गौतम अदानींविरोधात काँग्रेसने देशभरात आंदोलना केली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसची मात्र त्यांच्याबद्दल वेगळी भूमिका आहे, असे म्हटले जात होते. पण आता अदानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतल्यामुळे त्याला पुष्टी मिळत आहे.

गौतम अदानी यांनी सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि जवळपास दोन तास या दोघांमध्ये चर्चा झाली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य कोणतेही नेते उपस्थित नव्हते. केवळ पवार आणि अदानी यांच्यातच ही चर्चा झाली. या भेटीमुळे पुन्हा एकदा देशभरातील वातावरण ढवळून निघाले असून या चर्चेत नेमके कोणते विषय असतील हे मात्र कळू न शकल्याने वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत.

शरद पवारांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत अदानी यांची बाजू घेतली होती. अदानी प्रकरणात संयुक्त संसदीय समितीची गरज नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून जी समिती स्थापन केली जाईल, त्याद्वारे चौकशी करता येईल, अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली होती. शिवाय, हिंडेनबर्ग या संस्थेविषयीही शरद पवार यांनी शंका घेतली होती. त्यांच्या या भूमिकेबद्दल विरोधी पक्षातील सगळ्यांनाच धक्का बसला होता. शरद पवार यांची ती वैयक्तिक भूमिका असून आम्ही मात्र संयुक्त संसदीय समितीबाबत आग्रही आहोत, असे काँग्रेसने म्हटले होते.

हे ही वाचा:

म्हणून महाराष्ट्र म्हणतोय, बरे झाले ठाकरे सरकार गेले…

राहुल गांधी यांना धक्का, मानहानीबद्दल झालेली शिक्षा कायम

अतिक -अशरफ च्या तीन मारेकऱ्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी

कुत्र्यांनाही मिळाला स्थानिक अधिवासाचा हक्क, त्यांच्या परिसरातून हाकलता येणार नाही

संयुक्त संसदीय समितीबाबत शरद पवार म्हणाले होते की, या समितीत सत्ताधारी पक्षाचेच प्रतिनिधी अधिक असतात त्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयाकडून नेमण्यात आलेल्या समितीत विविध तज्ज्ञांचा समावेश असतो. त्यामुळे अशा संयुक्त समितीची गरज नाही.

अमेरिकेतील हिंडेनबर्ग या संस्थेने अदानींच्या व्यवहारांवर एक अहवाल तयार केल्यानंतर अदानींचे शेअर्स घसरले होते. तेव्हा अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संबंध काय असे विचारत काँग्रेसने देशभरात गदारोळ माजविला होता. अगदी नुकत्याच झालेल्या संसदेच्या अधिवेशनातही संयुक्त संसदीय समितीची मागणी करत कामकाज बंद पाडले होते. त्यामुळे आता अदानी आणि शरद पवार यांची भेट झाल्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहे.

Exit mobile version