काँग्रेसचा ‘हात’ सोडणाऱ्या गौरव वल्लभ यांचा भाजपात प्रवेश

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश

काँग्रेसचा ‘हात’ सोडणाऱ्या गौरव वल्लभ यांचा भाजपात प्रवेश

काँग्रेस पक्षाचे नेते गौरव वल्लभ यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्ष हा दिशाहीन होऊन पुढे चालला असून यात अनेक गोष्टी खटकत आहेत, असं म्हणत त्यांनी राजीनामा दिला आहे. पक्षासाठी सनातन विरोधी घोषणा देऊ शकत नाही. सकाळ-संध्याकाळ वेल्थ क्रिएटर्सला शिव्या देऊ शकत नाही. म्हणून काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे गौरव वल्लभ यांनी स्पष्ट केले. यानंतर आता गौरव वल्लभ यांनी गुरुवार, ४ एप्रिल रोजी काँग्रेस सोडल्यानंतर भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

दिल्लीत भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत गौरव वल्लभ यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा मोठा धक्का काँग्रेससाठी असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसपक्षाच्या सुरू असलेल्या वाटचालीवर त्यांनी चिंता व्यक्त करत नाराजी दाखविली आहे.

हे ही वाचा:

सिद्धू मुसेवालाचे वडील लोकसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत!

मोईत्रा यांच्या विरोधात ईडीकडून मनी लाँडरिंगचा गुन्हा

संजय निरुपम यांनी केलं स्पष्ट; आधी राजीनामा नंतर हकालपट्टी

३६ टक्के आयआयटी मुंबईचे पदवीधर नोकऱ्या मिळवण्यात अपयशी!

“काँग्रेस पक्ष दिशाहीन होऊन पुढे चालला आहे. यात अनेक गोष्टी खटकत आहेत. मी सनातन विरोधी घोषणा देऊ शकत नाही. सकाळ-संध्याकाळ वेल्थ क्रिएटर्सला शिव्या देऊ शकत नाही. म्हणून मी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देतोय,” असं म्हणत गौरव वल्लभ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच “राम मंदिर प्राण प्रतिष्ठेसंदर्भात काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर मी नाराज आहे. मी जन्माने हिंदू आणि कर्माने शिक्षक आहे. पक्षाची ही भूमिका मला पटली नाही. पार्टी आणि आघाडीतील अनेक नेते सनातन विरोधी बोलत असतात. पक्षाचे यावर गप्प रहाण हे मूक संमती देण्यासारख आहे,” अशी टीकाही गौरव वल्लभ यांनी केली आहे.

Exit mobile version