27 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरराजकारणमुंबईकरांसाठी गुड न्यूज..बालहट्टापायी मोडीत काढलेला गारगाई-पिंजाळ पाणी पुरवठा प्रकल्प पुन्हा सुरू होणार

मुंबईकरांसाठी गुड न्यूज..बालहट्टापायी मोडीत काढलेला गारगाई-पिंजाळ पाणी पुरवठा प्रकल्प पुन्हा सुरू होणार

शिंदे-फडणवीस सरकारची घोषणा.प्रकल्प रद्द करून महाविकास आघाडीने मुंबईकरांना मिळणारे हक्काचे पाणी पळवण्याचे केले होते काम

Google News Follow

Related

पर्यावरणाचे तकलादू कारण पुढे करून महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद करण्यात आलेला गारगाई-पिंजाळचा पाणी पुरवठा प्रकल्प लवकरच सुरू होणार. भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सरकारच्या वतीने उदय सांमत यांनी ही घोषणा केली आहे. मुंबईच्या भवितव्याच्या दृष्टीने प्रचंड महत्व असलेला हा प्रकल्प रद्द करून महाविकास आघाडीने मुंबईकरांना मिळणारे हक्काचे पाणी पळवण्याचे काम केले होते.

मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबवण्यात येणार होता. मुंबईला सध्या दररोज ४२०० दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा अपेक्षित आहे, परंतु फक्त ३८५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. २०४१ पर्यंत म्हणजे पुढील १८ वर्षात मुंबईची लोकसंख्या एक कोटी ७० लाखांचा टप्पा गाठेल अशी अपेक्षा आहे. तेव्हा पाण्याची गरज ५९४० दशलक्ष लिटर्स इतकी असेल.

पाण्याची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी हा प्रकल्प २०२१ पासून सुरू करण्यात येणार होता. गारगाई धरणातून दररोज ४४० दशलक्ष लि. पिंजाळ धरणातून ८६५ दशलक्ष लि. पाणी पुरवठा शक्य होणार आहे. हे दोन्ही प्रकल्प महापालिके मार्फत २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार होते. दमणगंगा प्रकल्प २०३० पर्यंत पूर्ण केला जाणार होता. यातून मुंबईला १५८३ दशलक्ष लि. पाणी उपलब्ध होणार होते.

२०२१ च्या डिसेंबर महीन्यात हा प्रकल्प रद्द करत असल्याची घोषणा पालिका आय़ुक्त आय़.एस. चहल यांनी केली होती. या धरणामुळे दोन हजार हेक्टर वनजमीन पाण्याखाली जाणार होती आणि साडे चार लाख वृक्षांची कत्तल करावी लागणार असे कारण देऊन हा प्रकल्प बासनात गुंडाळण्यात आला. त्या ऐवजी समुद्राचे खारे पाणी गोडे करून घेण्याचा प्रकल्प राबवण्याची घोषणा मविआने केली. पर्यावरणमंत्री आदीत्य ठाकरे यांच्या हट्टापायी हे घडले. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनीही त्यांना मम म्हटले होते. गारगाई-पिंजाळ प्रकल्प मोडीत काढण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, विकास हा मुळावर उठणारा नव्हे, तर शाश्वत टीकणारा हवा, पाण्यासाठी पर्यावरण गमावणे परवडणार नाही.

हे ही वाचा:

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी गेली; दोन वर्षांच्या शिक्षेमुळे कारवाई

‘पंतप्रधानांचा अपमान देशातील जनता सहन करणार नाही’

जाणून घ्या आजच्या ‘मत्स्य जयंतीबद्दल’

पासपोर्ट मिळाला नाही..अमृतपाल परदेशात पलायन करणार ?

गारगाई-पिंजाळ प्रकल्प रोखण्यामागे पैशाचे राजकारण आहे. मनोर येथल्या प्रकल्पातून राज्य सरकारला आपले उखळ पांढरे करून घ्यायचे आहे, असा आरोप भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी गेल्या अधिवशनादरम्यान केला होता. यंदाच्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात भातखळकर यांनी हा विषय लावून धरला. सरकारने त्याला सकारात्मक प्रतिसाद देत हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा