महाराष्ट्रात कोरोनाचा स्फोट झालेला आहे. रुग्णवाढ वेगाने होत असताना महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याद्वारे त्यांनी केंद्र सरकारवर बिनबुडाचे आरोप केले होते. मात्र ते आरोप सरकारमधील शिवसेनेच्या राहूल शेवाळे यांनी फेटाळले असल्याचे समोर येत आहे.
हे ही वाचा:
कशी आली केंद्राची ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्राच्या मदतीला?
कुंभ मेळा असो की रमजान कुठेही कोरोना नियमांकडे दुर्लक्ष करता येणार नाही
ठाकरे सरकारची अकार्यक्षमता झाकण्यासाठी नवाब मलिक यांनी खोटी माहिती दिली
आम्हाला गृहमंत्र्यांना पैसे द्यावे लागतात- पोलीस निरीक्षक
शिवसेनेचे खासदार राहूल शेवाळे यांनी मलिक यांचे आरोप नाकारत, केंद्र सरकार राज्याला सर्वतोपरी सहाय्य करत आहे, असे त्यांनी सांगितले आहे. राज्यात रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा आहे आणि केंद्र सरकार महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकू नये यासाठी कंपन्यांवर दबाव टाकत असल्याचा बेछूट आरोप मलिक यांनी केला होता.
मात्र शिवसेनेचे खासदार राहूल शेवाळे यांनी हा आरोप नाकारला आहे. त्यांनी हे सरकारचे मत नसल्याचे म्हटले आहे. त्याबरोबरच, हे राष्ट्रवादीच्या नेत्याचे वैयक्तिक मत असू शकते, ही सरकारची भूमिका नाही असे देखील त्यांनी सांगितले. उलट केंद्र आणि राज्य समन्वयाने काम करत असल्याची ग्वाही त्यांनी दिली. राज्याने केलेल्या मागण्या केंद्राने पूर्ण केल्या आहेत. आम्ही मनसुख मांडविय यांची भेट घेतली आणि बीआरडी फार्माकडे महाराष्ट्राने केलेली मागणी पूर्ण करण्यासाठी सहाय्य करण्याची विनंती केली होती. मांडवीय यांनी आपले म्हणणे नीट ऐकून घेतले आणि आम्हाला सर्वतोपरी सहाय्य करण्याचे वचन देखील दिले असे खासदार शेवाळे यांनी म्हटले आहे.
त्याबरोबरच, माझ्या माहितीप्रमाणे सध्या सरकारने संपूर्ण निर्यातबंदी लागू केली आहे, त्यामुळे मलिक काय म्हणत आहेत, ते मला माहित नाही अशी भूमिका शेवाळे यांनी घेतली आहे.
सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा स्फोट झालेला असून सध्या बेड्स, रेमडेसिवीर, ऑक्सिजन बेड्स, व्हेंटिलेटर यांचा तुटवडा जाणवत आहे.