29 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरराजकारण'साहेब फक्त स्टेजवर भिजून उपयोग नाही, आज शेतकरी खरा भिजला आहे'

‘साहेब फक्त स्टेजवर भिजून उपयोग नाही, आज शेतकरी खरा भिजला आहे’

Google News Follow

Related

सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीला मराठवाडा आणि विदर्भाला पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आणि जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जीवितहानी आणि वित्तहानीही मोठ्या प्रमाणावर झालेली असताना सरकारकडून पाहणीदौराही करण्यात आलेला नाही. विरोधी पक्षाने वेळोवेळी याबाबत आवाज उठवूनही शेतकरी अजूनही सरकारकडून येणाऱ्या मदतीच्या प्रतीक्षेत आहे. याच प्रकरणात भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या व्यथेचा व्हिडीओ शेअर करत सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

या व्हिडीओमध्ये उस्मानाबादचे शेतकरी राजेंद्र लोमटे हे त्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे आक्रोश करत असून चिपी विमानतळाच्या उद्घाटनाबद्दलही प्रश्न विचारत आहेत. उद्घाटन सोहळ्याला गर्दी केली, पण इथे शेतकरी मरणाच्या दारावर उभा आहे ते पाहायलाही आले नाहीत, असे त्यांनी सांगितले आहे. मतदान मागताना गोड गोड बोलायला येते, पण आता कोणीही आले नाही, असेही ते म्हणाले.

फक्त स्टेजवर पावसात भिजून काही होत नाही, इथे शेतकरी भिजला आहे, अशा भावना काकासाहेब लोमटे या शेतकऱ्याने व्यक्त केल्या. जनावरे वाहून गेल्याचे डोळ्यांनी पाहावे लागले. कोणतीही मदत पोहोचली नाही, असे दुःखही त्यांनी व्यक्त केले आहे. आता काय करायचे, फाशी घेऊन मारायचे का? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी विचारला आहे.

हे ही वाचा:

जळगावात फुकटसेनेच्या ‘रणरागिणींचा’ भलताच प्रताप

वाहतूक नियम मोडणाऱ्यांना लावणार जबरदस्त ‘ब्रेक’

एनसीबी संचालक वानखेडे यांच्या मागावर गुप्तहेर

नरिनच्या अष्टपैलू खेळीने कोलकाताला तारले

दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळख असणाऱ्या मराठवाड्यात यंदा विक्रमी पाऊस पडला. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून अनेक जनावरे वाहून गेली. संकटसमयी सरकारकडून मदतीसाठी काहीही हलचाल झाली नाही. त्यामुळे विरोधी पक्षाने सरकारवर टीकेची तोफही डागली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा