सिद्धू मुसवाला यांच्या हत्येमागे गँगस्टर गोल्डी ब्रार

सिद्धू मुसवाला यांच्या हत्येमागे गँगस्टर गोल्डी ब्रार

प्रसिद्ध गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मूसवाला याच्यावर आठ हल्लेखोरांनी हल्ला केल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. टोळीचा म्होरक्या लॉरेन्स बिश्नोई चा जवळचा सहकारी आणि कॅनडातील गँगस्टर गोल्डी ब्रार हा सिद्धू मुसेवाला याच्या हत्येमागे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी सरकारने चारशेहुन अधिक लोकांची सुरक्षा काढून घेतली. त्यांनतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे रविवारी सिद्धू मुसवाला यांची हत्या झाली आहे. मुसवाला आपल्या साथीदारांसह कारने जात होते. यादरम्यान काळ्या रंगाच्या कारमध्ये आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांच्यावर २० ते ३० गोळ्या झाडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनतर त्याला लगेच रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

हे ही वाचा:

‘घोडेबाजार करण्याचा प्रश्नच येत नाही’

UPSC परीक्षेत मुलींची बाजी

राकेश टिकैतवर शाईफेक

…तर हिंदूंना देश उरणार नाही!

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये गोल्डी ब्रार याने या हत्येचे कारण स्पष्ट केले आहे. सिद्धू मुसवाला यांनी गोल्डी ब्रारचा बाऊ विकी मिदुखडा याच्या एन्काऊंटरसाठी मदत केली होती, असा आरोप गोल्डी ब्रारने केला आहे. तसेच याचाच बदला या हत्येच्या रुपाने घेतल्याचे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे. या हत्येच्या काही वेळानंतरच पंजाब पोलिसांनी ही हत्या गँगवॉरमधून घडल्याचे म्हटले होते.

Exit mobile version