30 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरराजकारणगंगाविलास क्रूझ २५ नद्यांना जोडणार, अध्यात्म, भारतीय संस्कृतीचा होईल मिलाफ

गंगाविलास क्रूझ २५ नद्यांना जोडणार, अध्यात्म, भारतीय संस्कृतीचा होईल मिलाफ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले विवेचन

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगाविलास क्रूझ यात्रेच्या निमित्ताने भारतातील विविध घटकांचा कसा फायदा होणार आहे, याचे विस्तृत विवेचन आपल्या भाषणात केले. गंगाविलास क्रूझचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाल्यावर ते आपल्या भाषणात म्हणाले की, या यात्रेमुळे पूर्व भारतातील अनेक पर्यटन स्थळे जागतिक टूरिझमच्या टप्प्यात येतील.  त्यातून अनेक रोजगार उपलब्ध होतील.

ते म्हणाले की, गंगाजी आमच्यासाठी फक्त जलधारा नाही तर प्राचीन काळापासून महान भारतभूमीतील तप आणि तपस्येची साक्षी आहे. भारताची परिस्थिती कशीही राहिली असेल पण आई गंगेने नेहमी कोटी कोटी भारतीयांचे पालनपोषण केले आहे, प्रेरणा दिली आहे. पण गेल्या काही वर्षांत गंगाकिनारा मागास होत गेला. त्यामुळे लाखो लोकांचा गंगा किनाऱ्याहून पलायनही झाले. या स्थितीला बदलणे आवश्क होते म्हणून नवा दृष्टिकोन समोर ठेवत काम सुरू केले. एकेठिकाणी ‘नमामि गंगे’च्या माध्यमातून निर्मळतेसाठी काम केले दुसरीकडे अर्थगंगा हे अभियानही चालविले. जवळच्या राज्यात आर्थिक घडामोडींचे वातावरण तयार केले. गगाविलास क्रूझ या अर्थगंगेत अभियानाला नवी ताकद देईल.

उत्तर प्रदेश बिहार, आसाम, पश्चिम बंगाल, बांगलादेश यात्रेत क्रूझ सगळ्या सुविधा देईल. मी विदेश पर्यटकांचे अभिनंदन करतो जे या क्रूझच्या माध्यमातून प्रथम प्रवास करणार आहेत. आपण एका प्राचीन शहरात आणि आधुनिक क्रूझवरून प्रवास करणार आहात मी त्यांना सांगेन की, इंडिया हॅज एव्हरिथिंग दॅट यू कॅन इमॅजिन. इंडिया कॅननॉट डिफाइन इन वर्डस.

हे ही वाचा:

माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांचे निधन

जी-२० मध्ये भारताच्या नेतृत्वावर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा विश्वास

भाजप आता नव्या डिजिटल अवतारामध्ये

नाशिकमधून सत्यजीत तांबेंनी भरला अपक्ष अर्ज, काँग्रेसची गोची

जे अध्यात्माचा शोध घेत आहेत. विक्रमशीला, वाराणसी, पटना साहिब, काशी याचा प्रवास करता येईल. मल्टिनॅशन क्रूझचा अनुभव घेत आहेत त्यांना ढाक्यातून जाता येईल. नैसर्गिक विविधता बघायची आहे त्यांना आसाम व सुंदरबनच्या जंगलाचा प्रवास करून देईल. ही क्रूझ २५ वेगवेगळ्या नद्यांमधून जाणार आहे. जे लोक भारताच्या समृद्ध खाद्यपदार्थांचा अनुभव घेऊ इच्छितात त्यांच्यासाठीही ही उत्तम संधी. आपल्या युवकांना रोजगाराची संधी मिळेल. देशातील पर्य़टकांनाही हे आकर्षण असेल. आता विदेशात न जाता पूर्व भारताची सफर भारतातील पर्यटक करू शकतील. क्रूझ जिथून जाईल तिथे विकासाची एक नवी लाइनच तयार करेल. क्रूझ टूरिझमची अशीच व्यवस्था इतरही नद्यांमध्येही होईल. शहरांत छोट्या क्रूझनाही आम्ही संधी देऊ.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
194,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा