केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना ‘हम दो हमारे दो’ अशी काँग्रेस पक्षाची निती असल्याचा टोला काँग्रेस पक्ष आणि गांधी परिवाराला लगावला. काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणातून मोदी सरकार हे ‘हम दो हमारे दो’ वाले सरकार असल्याचा आरोप केला होता.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणातून मोदी सरकार हे ‘हम दो हमारे दो’ असल्याचा आरोप केला होता. राहुल गांधींनी मोदी सरकार हे भांडवलदारांच्या पाठीशी असलेले सरकार असल्याचा आरोप केला होता. यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे ‘हम दो’ आहेत आणि व्यावसायिक मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे ‘हमारे दो’ आहेत असा आरोप त्यांनी केला.
हे ही वाचा:
मात्र निर्मला सीतारमन यांनी राहुल गांधींच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना, काँग्रेस आणि गांधी परिवारच ‘हम दो हमारे दो’ ची निती अवलंबणारे आहेत असे त्या म्हणाल्या. त्यांनी राजस्थान आणि हरयाणामध्ये काँग्रेस पक्ष सत्तेत असताना ‘दामादजी’ (रॉबर्ट वाड्रा) यांना कवडीमोल किमतीत दिलेल्या जमिनींचा उल्लेख केला. सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे ‘हम दो’ आहेत तर प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा हे ‘हमारे दो’ आहेत असा टोला त्यांनी लगावला.
राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणाच्यावेळी अर्थसंकल्पावरील चर्चा सोडून शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा केली आणि नंतर मौन धारण केले याचीही आठवण त्यांनी करून दिली. राहुल गांडीचे हे वर्तन असंसदीय असल्याचा आरोपही त्यांनी केला.