स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली काम करणार ‘गांधी-नेहरू’

स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली काम करणार ‘गांधी-नेहरू’

राजकारणात एरवी आरोप-प्रत्यारोप होत असले आणि सातत्याने वादविवादांमुळे तणावग्रस्त वातावरण राहात असले तरी राजकारणातील काही घटनांमुळे चेहऱ्यावर हास्यही फुलते. तामिळनाडूत आता द्रमुकचे सरकार अस्तित्वात आले आहे. स्टॅलिन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली आहे. स्टॅलिन यांच्या मंत्रिमंडळात गांधी आणि नेहरू या आडनावाचे दोन मंत्री असल्यामुळे यापुढे गांधी आणि नेहरू हे स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली काम करतील, असे म्हणायला हरकत नाही. आडनावांमुळे झालेली ही एक गंमत आहे.

हेही वाचा:

तामिळनाडूत स्टालिन राज सुरु

शिवसेनेचा ‘हा’ बडा नेता भाजपाच्या वाटेवर

वडोदरामध्ये चिप अडकवलेले कबूतर पकडले

आता रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबणार

चारवेळा आमदार राहिलेले आर. गांधी राणीपत मतदारसंघातून यावेळी निवडून आले आहेत आणि ते खादी उद्योगाचे मंत्री आहेत. तर के.एन. नेहरू हे त्रिची मतदारसंघातून पाचवेळा निवडून आले आहेत. हे नगरविकास खात्याचे मंत्री आहेत.

मजा म्हणजे तामिळनाडूमध्ये आणखी एक गांधी आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांचे नाव एम.आर. गांधी असे आहे. मात्र ते भाजपाकडून निवडून आल्यामुळे तामिळनाडू विधानसभेत आता दोन गांधी, एक नेहरू आणि स्टॅलिन असे चित्र पाहायला मिळणार आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, स्टॅलिन यांच्या मंत्रिमंडळातील गांधी आणि नेहरू आडनावाच्या मंत्र्यांवर मात्र याआधी भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. २००५मध्ये आर. गांधी, त्यांची पत्नी आणि मुलावर बेहिशेबी मालमत्तेचे आरोप झालेले आहेत. मात्र २०१५मध्ये हे आरोप न्यायालयात सिद्ध होऊ शकले नाहीत.

नेहरू आडनावाच्या मंत्र्यावरही भ्रष्टाचार आणि अनेक गुन्हे दाखल आहेत. जमिनी बळकावण्याचेही आरोप त्यांच्यावर झालेले आहेत. मात्र हे आरोप नंतर सिद्ध झालेले नाहीत.

एक मात्र खरे की, आता तामिळनाडू विधानसभेत प्रश्नांना उत्तरे देताना किंवा आपली बाजू मांडताना गांधी यांची वेळ संपली, नेहरू यांनी आता बोलावे असे विधानसभा अध्यक्षांना सांगावे लागणार आहे.

Exit mobile version