देशातील पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका होत आहेत. आसाममध्ये देखील ६ एप्रिल पासून मतदानाला सुरूवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचाराची शेवटची सभा तामुलपूर येथे पार पडली.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की आसामच्या लोकांनी पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. महाजोत आघाडीचे (आघाडी) महाझूठ समोर आले आहे. मी माझ्या राजकीय अनुभवावरून आणि लोकांकडून मिळालेल्या प्रेमावरून हे सांगू शकतो की, लोकांनी पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन करण्याचे नक्की केले आहे. आसामच्या ओळखीवर कोणी वारंवार हल्ले करेल हे आसामचे लोक सहन करणार नाहीत. असेही मोदी यांनी सांगितले.
हे ही वाचा:
सचिन वाझेशी संबंधित आणखीन एक गाडी एनआयएच्या ताब्यात
मलंगगड प्रकरणात चार मुसलमान तरुणांना अटक
आम्ही जनतेसाठी कोणत्याही भेदभावाशिवाय काम करतो, परंतु काही लोक आपल्या देशात मतपेटीसाठी फुट पाडू इच्छितात आणि दुर्दैवाने यालाच सेक्युलारिजम (धर्मनिरपेक्षता) म्हणतात. आम्ही लोकांसाठी काम केले की आम्हाला कम्युनल (संप्रदायीक) म्हणतात. या सेक्युलारिजम आणि कम्युनालिजमच्या खेळाने देशाचे मोठे नुकसान केले आहे.
ही सभा चालू असताना एका कार्यकर्त्याला उष्म्याचा त्रास झाला त्यावेळी मोदींनी तात्काळ त्यांच्यासोबत आलेल्या डॉक्टरांच्या चमूला त्या व्यक्तीकडे लक्ष देण्यास सांगितले.
Addressing a rally in Tamulpur. Watch. https://t.co/sBxRPPVF2c
— Narendra Modi (@narendramodi) April 3, 2021
अजून निवडणुका चालू आहेत. काल मी काही लोकांना बोलताना ऐकले की आता पुढील सरकार त्यांचेच बनेल आणि त्या सरकारमधील लोकांनी काय घातले असेल. आसामच्या लोकांचा यापेक्षा जास्ती मोठा अपमान असू शकत नाही. आसामची सत्ता पुन्हा मिळवायला हे अतिशय आतूर झाले आहे.
काँग्रेसच्या आसाममधल्या सरकारने आसामला हिंसा, बाँब आणि बंदुकांशिवाय काही दिलं नाही. त्यावेळी एनडीए सरकार असताना आसाम विकासाच्या मार्गावर पुढे चालला आहे.
प्रथमच मतदान करणाऱ्या तरूणांना देखील त्यांनी काही उपदेश केला. ते म्हणाले की, पहिल्यांदाच मतदानाला जाणाऱ्या सर्व तरूणांना माझी विनंती आहे. तुम्ही भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी जे मतदान कराल ते आपण स्वातंत्र्याची शंभरी साजरी करू तेव्हा आसाम किती पुढे गेला असेल ते ठरवणार आहे.