28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरराजकारणसेक्युलरिजम आणि कम्युनलिजमच्या खेळाने देशाचे मोठे नुकसान केले आहे

सेक्युलरिजम आणि कम्युनलिजमच्या खेळाने देशाचे मोठे नुकसान केले आहे

Google News Follow

Related

देशातील पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका होत आहेत. आसाममध्ये देखील ६ एप्रिल पासून मतदानाला सुरूवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचाराची शेवटची सभा तामुलपूर येथे पार पडली.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की आसामच्या लोकांनी पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. महाजोत आघाडीचे (आघाडी) महाझूठ समोर आले आहे. मी माझ्या राजकीय अनुभवावरून आणि लोकांकडून मिळालेल्या प्रेमावरून हे सांगू शकतो की, लोकांनी पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन करण्याचे नक्की केले आहे. आसामच्या ओळखीवर कोणी वारंवार हल्ले करेल हे आसामचे लोक सहन करणार नाहीत. असेही मोदी यांनी सांगितले.

हे ही वाचा:

सचिन वाझेशी संबंधित आणखीन एक गाडी एनआयएच्या ताब्यात

सचिन वाझेच्या प्रकृतीला धोका

मलंगगड प्रकरणात चार मुसलमान तरुणांना अटक

आम्ही जनतेसाठी कोणत्याही भेदभावाशिवाय काम करतो, परंतु काही लोक आपल्या देशात मतपेटीसाठी फुट पाडू इच्छितात आणि दुर्दैवाने यालाच सेक्युलारिजम (धर्मनिरपेक्षता) म्हणतात. आम्ही लोकांसाठी काम केले की आम्हाला कम्युनल (संप्रदायीक) म्हणतात. या सेक्युलारिजम आणि कम्युनालिजमच्या खेळाने देशाचे मोठे नुकसान केले आहे.

ही सभा चालू असताना एका कार्यकर्त्याला उष्म्याचा त्रास झाला त्यावेळी मोदींनी तात्काळ त्यांच्यासोबत आलेल्या डॉक्टरांच्या चमूला त्या व्यक्तीकडे लक्ष देण्यास सांगितले.

अजून निवडणुका चालू आहेत. काल मी काही लोकांना बोलताना ऐकले की आता पुढील सरकार त्यांचेच बनेल आणि त्या सरकारमधील लोकांनी काय घातले असेल. आसामच्या लोकांचा यापेक्षा जास्ती मोठा अपमान असू शकत नाही. आसामची सत्ता पुन्हा मिळवायला हे अतिशय आतूर झाले आहे.

काँग्रेसच्या आसाममधल्या सरकारने आसामला हिंसा, बाँब आणि बंदुकांशिवाय काही दिलं नाही. त्यावेळी एनडीए सरकार असताना आसाम विकासाच्या मार्गावर पुढे चालला आहे.

प्रथमच मतदान करणाऱ्या तरूणांना देखील त्यांनी काही उपदेश केला. ते म्हणाले की, पहिल्यांदाच मतदानाला जाणाऱ्या सर्व तरूणांना माझी विनंती आहे. तुम्ही भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी जे मतदान कराल ते आपण स्वातंत्र्याची शंभरी साजरी करू तेव्हा आसाम किती पुढे गेला असेल ते ठरवणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

एक कमेंट

  1. Mala..Bhart.deshati.kontahi.Rajkarni.
    Avdt.nahi.प्रत्येकजण.bhrstacari.आहेत.कोण.साधू.
    संत.नाही.शेतकरी.atmhty.करत.आहेत.बलात्कार.
    अपहरण.चोऱ्या..गुंड.लाच.वशिलेबाजी.तरुणांना.
    नोकऱ्या.नहित. बेकारी.शिक्षणाचा.bazar..vikat. न्याय.
    गरीबाला.दोन. घास.अन्न.मिळेना. विदर्भ.mrthvada
    चिमणीला.पाणी.मिळेना. कोणाची. तमा.नाही.घटनेत.
    Dhavladvl.kun.Desh.chalvitat.ya.deshat.
    खरोखर.शिवशाही.पाहिजे.जय.shivray..s

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा