‘माझे तिकीट उद्धव ठाकरे यांनी कापले’

‘माझे तिकीट उद्धव ठाकरे यांनी कापले’

गजानन कीर्तिकर यांनी ठाकरे गटाला रामराम करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर कीर्तिकर यांनी मीडियाशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केला आहे. उद्धव ठाकरे यांनी माझं तिकीट कापण्याचा प्रयत्न केला असं म्हणतं कीर्तिकर यांनी ती घटना सांगितली आहे.

एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित गजानन कीर्तिकर शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यानंतर कीर्तिकर यांनी मीडियाशी संवाद साधला. ते म्हणाले, व्ही.के. सिंह नावाचा उत्तर भारतीय बिल्डर असून, त्याचा रमेश सिंह भाऊ आहे. त्याला तिकीट देण्यासाठी उद्धव ठाकरे आणि बिल्डरची खलबत सुरु होती. पण बाळासाहेबांनी ते होऊ दिलं नाही आणि मला तिकीट देण्यात आलं.

पुढे ते म्हणाले, मला बाळासाहेबांनी चौथ्यांदा तिकीट दिलं होते. त्यानंतर २००९मध्ये माझा पत्ताच कट झाला, मला उमेदवारी दिली नाही. सुनील प्रभू नावाचे माझे पीए आहेत. त्याला नेहमी बोलवून मी तुला तिकीट देणार आहे. कीर्तिकरांना तिकीट देणार नाही, असं सांगितलं जात होत.

शिवसेनेत असताना तोंड दाबून बुक्क्यांचा मार होता. आम्ही अपमान सहन करत होतो. मात्र,आम्ही शिवसेना सोडली नाही. २०१९ला आम्ही एनडीएसोबत होतो. आम्हाला मंत्रिपद मिळालं पण ते अरविंद सावंत यांना दिलं. तुमची खासगी माणसं आणि तुमच्या मर्जीतल्या माणसाला दिलं. तेव्हा का शिवसेनेचा ज्येष्ठ नेता आठवला नाही? गजानन कीर्तिकर का आठवला नाही? असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे.

हे ही वाचा:

हिमाचलमध्ये आजी म्हणाली, मोदी हमारा बच्चा है, उसने देश बचाया!

महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक, १२ हजार रोजगार होणार निर्माण

‘या’ कारणामुळे ट्विटरच्या ‘ब्लू टिक’ पेड सबस्क्रिप्शनचा निर्णय मागे

आरेमध्ये बिबट्याचा महिलेवर जीवघेणा हल्ला

महाविकास आघाडी सरकारवेळी उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊ नका तरीही गेले, अशी खंत कीर्तिकर यांनी व्यक्त केली आहे. आता ४० आमदार गेले, १५ बाकी आहेत. १३ खासदारही गेले आता पाच बाकी आहेत. भाजपसोबतची नैसर्गिक युती कायम ठेवावी, असंही आवाहन कीर्तिकर यांनी यावेळी ठाकरे गटाला केले आहे.

Exit mobile version