पुस्तक योग्यवेळी प्रकाशित झाले नाहीतर लोकाधिकारचं काम एकाधिकारवाल्यांनी लाटलं असतं

शिवसेना नेते गजानन कीर्तीकर यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी दिला टोमणा

पुस्तक योग्यवेळी प्रकाशित झाले नाहीतर लोकाधिकारचं काम एकाधिकारवाल्यांनी लाटलं असतं

मी राज्यात अनेकठिकाणी जातो पण तिथे लोक गजाभाऊ कीर्तीकरांचं नाव काढतात. कीर्तीकरांनी खूप मेहनत घेतली. जबाबदारी दिली ती पार पाडली. संघटना वाढविली. स्थानिकांना न्याय देण्यासाठी मेहनत घेतली. शिवसेना, लोकाधिकार आणि मी हे त्यांचे आत्मचरित्रात्मक पुस्तक योग्यवेळी प्रकाशित होत आहे याचा आनंद आहे. नाहीतर लोकाधिकारचं काम एकाधिकार वाल्यांनी लाटलं असतं, अशा शब्दांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर यांच्या शिवसेना, लोकाधिकार आणि मी या पुस्तकप्रकाशन सोहळ्यात त्यांच्या कार्याचे कौतुक केले आणि उद्धव ठाकरेंना टोमणाही लगावला.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी कीर्तीकर यांनी केलेल्या कार्याची दखल घेतली. शिवसेनेसारखी संघटना कीर्तीकरांसारख्या कार्यकर्त्यांमुळे वाढली, बळकट झाली असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ‘मला कीर्तीकरांच्या या पुस्तकसोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी मिळाली.  कीर्तीकरांच्या या वाटचालीत वहिनींचा वाटा मोठा आहे. त्या कायम त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. आज आगळावेगळा असा समारंभ आहे. कौटुंबिक समारंभ आहे. भाऊंचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन. शिवसेनेचा इतिहास, स्थानिय लोकाधिकार समितीचा इतिहास.  वस्तुनिष्ठ लिहिण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.म्हणून मी सगळ्यांच्या वतीने वाढदिवसांच्या शुभेच्छा देतो.’   प्रसिद्ध पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकरांचा सत्कार यावेळी झाला.

मुख्यमंत्री म्हणाले की, त्या काळातील घटना आपण पाहिल्या तर त्यावेळेस बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना वाढविण्य़ाचे काम घराघरात, लोकांच्या मनामनात पोहोचवण्याचे काम झाले. आज सगळ्या साधनसुविधा आहेत. अगदी खेडोपाड्यात जाऊन शिवसेना पोहोचविण्याचे काम केले. आज आपण पाहतोय शिवसेना स्थानिय लोकाधिकार समितीमुमळे महाराष्ट्रात मराठी माणसाचा आवाज बुलंद झाला. सुधीरभाऊंची आठवण येते. हे दोघे या समितीचे आधारस्तंभ.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मराठी माणसाला बँका, रेल्वे या शासकीय नोकऱ्या मिळत नव्हत्या. या केंद्रशासित व नोकऱ्या मिळू लागल्या स्थानीय लोकाधिकारमुळे. स्थानीय लोकाधिकार समिती आणि कीर्तीकर हे घट्ट नाते होते ते सांगण्याची गरज नाही. भूमिपुत्राच्या न्यायहक्कासाठी सुवर्णमहोत्सवी टप्पा ओलांडला या संघटनेने. त्यावेळी निवडणुका आल्या की, स्थानीय लोकाधिकार समिती होती. ही सर्वे करायची अंदाज घ्यायची आणि रिपोर्ट सादर करायची. पडद्याच्या मागे राहून कामे केली. खऱ्या अर्थाने शिवसेनेबरोबर पावलावर पाऊल टाकत काम करत राहिली. रिझर्व्ह बँकेत गजानन भाऊ कामाला होते. आरामात राहू शकले असते. तेव्हा १९६८ साली रिझर्व्ह बँकेत त्यांनी लोकाधिकार समितीची शाखा सुरू केली. त्या शाखांमधून ८० ते ९० हजार मराठी मुलांना नोकऱ्या दिल्या. त्यावेळेस एअर इंडियात फ्लाइट पर्सर परीक्षेत मराठी मुले पास झाली, पण भरतीत संख्या कमी दिसली. पण गजाभाऊ एअर इंडियात गेले आणि जितेंद्र भार्गव अधिकारी होते त्यांना सांगितले की, पास झालेला मराठी तरुण नोकरीला लागलाच पाहिजे. ते आश्वासन मिळाल्यावर कार्यालय सोडले. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून त्यावेळेस प्रत्येक कार्यालयात जय महाराष्ट्र ही गर्जना ऐकू येऊ लागली. एक शिस्तबद्ध संघटना म्हणू स्था. लो. समितीकडे पाहिले जाते. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनीही त्या संस्थेची दखल घेतली.

 

मुख्यमंत्री म्हणाले की, असेच मेहनती कार्यकर्ते बाळासाहेबांना आवडत असत. त्यांना ताकद द्यावी लागते. ते आपल्या माणसाला निवडून आणण्यासाठी मदत करतात. म्हणून नेत्यांनी त्याच्या पाठीशी उभे राहिले तर तो संघटनेला विसरणार नाही.तरच संघटना मोठी होईल. पण काही कार्यकर्ते काम करायला लागले की त्याचे पंख छाटले जातात. त्याजागी दुसरा माणूस उभा केला जातो. बाळासाहेब असे करत नव्हते. तोलामोलाचे कार्यकर्ते एकत्र काम कसे करतील, पक्षसंघटना पुढे कसे नेतील हे बघत असतं.

 

आम्ही जेव्हा गुवाहाटी गेलो तेव्हा भाऊंनी प्रयत्न केला उद्धव ठाकरे यांना समजावण्याचा. ते म्हणाले होते की, यांचा निर्णय योग्य आहे त्यांना पाठिंबा द्या. प्रत्येकाच्या हातात हे पुस्तक जाईल हे पाहू. सगळी वस्तुस्थिती आहे पुस्तकात. आपल्याकजे शिवसेना आहे आणि धनुष्यबाणही. आज इंडिया अलायन्समध्ये आलेले सगळे त्यांची आवभगत कशी केली ते राणेंनी सांगितले. आम्ही दिल्लीला जातो त्यावर लोक टीका करतात, आम्ही अभिमानाने सांगतो राज्यासाठी, काही ना काही आणण्यासाठी आम्ही जातो. या सरकारच्या काळात आम्ही बंद झालेले प्रकल्प पुन्हा सुरू केले. अनेक प्रकल्प बंद केले होते. इगोमुळे बंद झाले. इगो बाजुला ठेवायचा असतो. राज्याचे हित समोर ठेवून काम करायचे असते.  म्हणून या टीका होतात. कोविडमध्ये माणसं मरत होती आणि काही जण पैसा कमावत होते. कुठे फेडणार हे पाप.

Exit mobile version