केंद्रीय मंत्री नितिन गडकरींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामुळे खळबळ उडाली. त्यांचे हे पत्र शिवसेनेला चांगलेच झोंबले आहे.
त्यामुळे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी नितीन गडकरींना असा सवाल विचारला आहे की, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून बोलायला हवे होते. पत्र लिहिण्याची काय गरज होती.
गडकरींनी लिहिलेले पत्र प्रसिद्धी माध्यमात पर्यंत कसे आले? असा प्रश्नही शिवसेना नेते आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांना पडला आहे. शिवसैनिकांची तक्रार असेल तर गडकरीं यांनी मार्ग काढायचा की शिवसेनेला मिळेल तिथे ठोकायचे असेही भास्कर जाधव यांना वाटते आहे.
चिपळूणमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तांना भेट दिली तेव्हा भास्कर जाधव यांच्या अरेरावीने महाराष्ट्रात संतापाचे वातावरण तयार झाले होते. प्रताप सरनाईक यांनी मागे उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. ते मंत्रालयातून प्रसारमाध्यमांत पोहोचले होते. शरद पवारांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेले पत्र असेच मीडियातूनच समोर आले होते. त्यावेळी मात्र भास्कर जाधव यांनी हा मुद्दा उपस्थित केल्याचे दिसले नव्हते.
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची तक्रार केली होती. या पत्रामधून शिवसेनेचे स्थानिक नेते महामार्गाच्या कामात अडथळे आणतात, अशी तक्रार गडकरी यांनी केली होती. त्यामुळे सेनेचे नेते चांगलेच अडचणीत सापडले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घडल्या प्रकरणी लगेच चौकशीचे आदेशही दिले होते. मुख्यमंत्री ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अतिशय जवळचे संबंध आहेत. एकमेकांबद्दल आदराची भावना आहे. गडकरी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहू शकतात, त्यांना तो अधिकार आहे असे म्हणताना यावेळी मात्र गडकरींनी ठाकरे यांच्याशी फोनवर बोलायला हवे होते, असाही सल्ला ते देतात. पण शिवसैनिकांची तक्रार करायची होती तर गडकरी यांनी ठाकरे यांना फोन करून ही याबाबतची माहिती दिली असती. पण गडकरी यांनी पत्र का लिहले आणि तेथे प्रसिद्धी माध्यमांसमोर का आले? तुम्हाला कोणाची तक्रार असेल तर त्यातून मार्ग काढायचा आहे की, शिवसेनेला संधी मिळेल त्या ठिकाणी ठोकायचे आहे. असा प्रश्नही त्यांना पडला.
हे ही वाचा:
पॉलिशच्या बहाण्याने चोरट्यांनी केली महिलेच्या दागिन्यांची सफाई
विवेक पाटीलांना ईडीचा दणका…२३४ कोटींची मालमत्ता जप्त
‘पालघरकडे का होते आहे राज्य सरकारचे दुर्लक्ष?’
पुण्यात उभारले गेले पंतप्रधान मोदींचे मंदिर
पश्चिम बंगालच्या निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला होता पण प्रचारात असल्यामुळे ते त्यांच्याशी बोलले नाहीत, या बातमीची प्रसारमाध्यमांत चर्चा होती. एकूणच संवादासाठी पत्र लिहावे की फोनवर बोलावे हा चर्चेचाच विषय बनला आहे.