… आणि २० देश जम्मू काश्मीरमध्ये एकत्र येणार

… आणि २० देश जम्मू काश्मीरमध्ये एकत्र येणार

आर्थिकदृष्ट्या प्रगत असलेल्या देशांचा समूहाची पुढील वर्षी होणारी परिषद जम्मू आणि काश्मीरमध्ये होणार आहे. जी-२० समुहाची २०२३ मध्ये होणारी परिषद ही जम्मू काश्मीरमध्ये होणार असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

आर्थिकदृष्ट्या प्रगत असलेले प्रमुख देश जी २० या समूहात आहेत. यंदा १ डिसेंबरपासून ३० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत या समुहाचे अध्यक्षपद भारताकडे असेल, असे परराष्ट्र मंत्रालयाने यापूर्वीच जाहीर केले आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये ३७०वे कलम रद्द करण्यात आल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये प्रथमच महत्त्वाची आंतरराष्ट्रीय बैठक होणार आहे. यासाठी पाच सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांची या समूहातील भारताचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाली. २०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. जी-२० समूहात काही प्रमुख युरोपीय देशांचाही समावेश आहे. सदस्य देशांचा जागतिक लोकसंख्येत ६० टक्के, जागतिक व्यापारात ७५ टक्के तर एकूण देशांतर्गत उत्पन्नात ८० टक्के वाटा आहे.

हे ही वाचा:

पाकने मृत घोषित केलेल्या २६/११ च्या हँडलरला घेतलं ताब्यात

धावत्या लोकलमध्ये स्टंटबाजी करणारा तरुण खाली कोसळला

‘माझे मुख्यमंत्रीपद मान्य नसणे ही राक्षसी महत्त्वाकांक्षा’

एकनाथ शिंदे यांची शिवसेनेवर कारवाईची मागणी

अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, जर्मनी, फ्रान्स, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्की, युके आणि अमेरिका हे देश या समुहात आहेत.

Exit mobile version