रमेश देव यांच्यावर अंत्यसंस्कार, राज ठाकरे यांनीही घेतले दर्शन

रमेश देव यांच्यावर अंत्यसंस्कार, राज ठाकरे यांनीही घेतले दर्शन

प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक रमेश देव यांचे बुधवारी हृद्यविकाराच्या धक्क्याने निधन झाल्यानंतर आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जुहू येथील त्यांच्या निवासस्थानी हे पार्थिव ठेवण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवाच्या दर्शनाला कलाकार मंडळींसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील पोहचले होते. यावेळी महेश मांजरेकर देखील त्यांच्यासोबत होते.

रमेश देव यांच्या प्रतिमेला राज ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित जनतेशी संवाद साधला. त्याचवेळी त्यांनी रमेश देव यांच्या कुटुंबीयांशीही संवाद साधून त्यांचे सांत्वनही केले. या वेळी ठाकरेही अत्यंत उदास दिसत होते.

कला आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी देव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आले होते. महेश मांजरेकर हेदेखील यावेळी उपस्थित होते. त्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह दिग्गजांनी सोशल मीडियावरून देव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

हे ही वाचा:

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’नंतर आता पंतप्रधानांचे लक्ष ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’कडे

राहुल यांच्या वक्त्यव्यावर केंद्रीय मंत्र्यांचा हल्लाबोल…

कॅप्टन कूलचा नवा लूक!

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’नंतर आता पंतप्रधानांचे लक्ष ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’कडे

सयाजी शिंदे यांच्यासोबत बोलताना रमेश देव यांनी आपली शंभर वर्ष जगायची इच्छा आहे, असे म्हटले होते. टीव्ही 9 मराठीसोबत बोलताना त्यांनी रमेश देव यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. दरम्यान, अशोक सराफ यांनीही रमेश देव यांच्या जाण्यानं मोठा धक्का बसला असल्याचे म्हटले आहे.

३० जानेवारीला रमेश देव यांचा ९३ वा वाढदिवस साजरा झाला होता. दरम्यान, त्यानंतर दोनच दिवसांनी त्यांच्या निधनाने चाहत्यांसह संपूर्ण देव कुटुंबीय शोकसागरात बुडाले आहेत. रमेश देव यांनी सिनेसृष्टीत दीर्घकाळ काम केले आहे. भूमिका कोणतीही असो देव नेहमी सकारात्मक असायचे.

 

Exit mobile version