24 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरराजकारणमेटेंचा लढा वाया जाऊ देणार नाही

मेटेंचा लढा वाया जाऊ देणार नाही

मराठा समाजाचे नेते आमदार विनायक मेटे अनंतात विलिन

Google News Follow

Related

मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे आमदार विनायक मेटे यांचं रविवारी मुंबई – पुणे एक्सप्रेसवेवरील अपघातात निधन झाले. मराठा आरक्षणचा लढा शेवटपर्यंत लावून धरणारे विनायक मेटे हे आरक्षणाच्या बैठकीसाठी मुंबईला येत असताना हा अपघात सर्वांनाच जास्त चटका लावणारा हाेता. रविवारी रात्री त्यांचे पार्थिव उशीरा बीडमध्ये आणण्यात आले. साेमवारी संध्याकाळी बीडमधील उत्तमनगर येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मराठा चळवळीचा कुटुंब प्रमुख गमावल्याच्या भावना अंत्यसंस्काराला उपस्थित असलेल्या शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर हाेत्या. विनायक मेटे अमर रहे च्या घाेषणा देत विनायक मेटेंना अखेरचा निराेप देण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्र व राज्यातील अनेक मंत्री व नेते यावेळी उपस्थित हाेते. मेटे यांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, विनायक मेटे यांचे निधन ही काेणाचाही विश्वास न बसणारी आणि अत्यंत वेदना देणारी घटना हाेती. काही माणसं ही कुटुंबापुरती मर्यादीत असतात. पण मेटे यांची तळमळ समाजाला मिळवून देण्याची हाेती. संपूर्ण मराठा समाज हाच त्यांचा परिवार हाेता.आमच्या बैठकीत त्यांनी कधीच वैयक्तिक मागणी केली नाही तर मराठा आरक्षण हाच त्यांचा ध्यास हाेता. मराठा समाजाला न्याय मिळावा त्यांची तळमळ हाेती. राज्यात नवं सरकार आल्यानंतर मराठा समाजाला न्याय मिळेल असा त्यांचा विश्वास हाेता. त्याबद्दल त्यांनी बाेलूनही दाखवलं हाेतं. त्यामुळे मेटे यांचा लढा वाया जाऊ देणार नाही असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेटे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मेटे यांच्या पत्नी ज्याेती मेटे यांची भेट घेऊन त्यांचे यावेळी सांत्वन केले. यावेळी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकर, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे- पाटील, संदीपान भुमरे , रामदास आठवले, भारती लव्हेकर यांच्यासह केंद्र व राज्य सरकारमधील मंत्री, नेत्यांनी अंत्यसंस्काराला उपस्थिती लावली हाेती.

हे ही वाचा:

७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गुगलकडून खास डूडल

बोलण्यातून, वागण्यातून महिलांचा अपमान करू नका

गांधीजी, डॉ. आंबेडकर, सावरकर, सुभाषबाबूंचा त्याग विसरता येणार नाही

गुलामीचा अंश मिटवूया; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिले पाच संकल्प

मेटेंनी हाती घेतलेले काम पूर्ण करण्याचा संकल्प

काय बाेलायचे यासाठी शब्द सुचत नाही. मी आरक्षणाच्या बैठकीला येत आहे. सकाळी आल्यावर बाेलताे असा मेसेज माेबाइलवर आला आणि सकाळी अशा प्रकारची दु:खद घटना ऐकावी लागेल असे वाटले नाही. माझ्यावर प्रचंड प्रेम करणारी व्यक्ती आज नाही याचे वैयक्तिक दु:ख वाटते. सामान्य परिस्थितीतून वर येत स्वत:च्या बळावर त्यांनी नेतृत्व निर्माण केले. सामान्य तरुणाईला जाेडले. भेटीत कधी वैयक्तिक विषय न मांडता ते नेहमी मराठा आरक्षणावरच बाेलायचे. त्यांच्याबद्दल बाेलण्यासारख्या आठवणी खूप आहेत. विनायकरावांनी हाती घेतलेले काम पूर्ण करण्याचा संकल्प करताे, हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल, अशा भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा