फरार खलिस्तानी दहशतवाद्याला दिल्लीत अटक…राष्ट्रीय तपास यंत्रणेची कारवाई.

फरार खलिस्तानी दहशतवाद्याला दिल्लीत अटक…राष्ट्रीय तपास यंत्रणेची कारवाई.

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना मोठे यश आले आहे. खलिस्तानी दहशतवादी गुरुजीत सिंह निग्गर याला दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली. निग्गर हा सायप्रस मध्ये लपून बसला होता.

 

निग्गर हा पुणे खलिस्तान खटल्यातील मुख्य आरोपी आहे. निग्गर आणि त्याचे दोन सहकारी हरपाल सिंह आणि मोईन खान हे सोशल मीडियावर सक्रिय असून त्याद्वारे खलिस्तानी मोहीम पुनरुज्जीवित करण्यासाठी कार्यरत होते. निज्जर हा २०१७ सालीच भारत सोडून सायप्रसला पळाला. भारतीय तपस यंत्रणा त्याच्या मागावर होत्या.

 

दिल्लीतील शेतकरी आंदोलनात खलिस्तानी समर्थक घुसल्याचे आरोप होत असतानाच निग्गर याचे दिल्लीत दाखल होणे संक्षयाचे धुके अधिकच गडद करत आहे.

Exit mobile version