‘मन की बात’ मधून गोदावरी स्वच्छतेसाठी झटणाऱ्या नंदकिशोर यांचे कौतुक

‘मन की बात’ मधून गोदावरी स्वच्छतेसाठी झटणाऱ्या नंदकिशोर यांचे कौतुक

आज सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात देश-विदेशातील लोकांसमोर आपले विचार मांडले. मासिक रेडोओ कार्यक्रमाचा हा ८७ वा भाग होता. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान मोदी ‘मन की बात’च्या माध्यमातून देशाला संबोधित करतात. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी भारताने निर्यातीत मिळवलेल्या यशाचे कौतुक केले आहे.

भारताने तीस लाख कोटींच्या निर्यातीचे गाठलेल्या लक्ष्याचे पंतप्रधानांनी खूप कौतुक केले आहे. कार्यक्रमात पंतप्रधान म्हणाले की, आपल्या देशाने तीस लाख कोटींची निर्यात केली आहे, जी ऐतिहासिक आहे. त्यातून भारताची क्षमता दिसून येतेय. याचाच अर्थ जगात भारतीय वस्तूंची मागणी वाढत आहे.

भाषणादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या पद्म पुरस्कार सोहळ्याबद्दल त्यांनी सांगितले आहे. यावेळी पंतप्रधानांनी बाबा शिवानंद यांचा उल्लेख केला. ते म्हणाले, नुकत्याच पार पडलेल्या पद्म पुरस्कार सोहळ्यात तुम्ही बाबा शिवानंद यांना पाहिले असेल, त्यांचा उत्साह आणि फिटनेस पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. त्यांची प्रकृती देशाभरात चर्चेचा विषय आहे. त्यांना योगाची आवड आहे. पुढे कतारमध्ये झालेल्या योग कार्यक्रमाचेही पंतप्रधानांनी कौतुक केले आहे.

‘मन की बात’ मध्ये त्यांनी नाशिकच्या चंद्रकिशोर पाटील यांचा उल्लेख केला. पाटीलांनी गोदावरी नदी स्वच्छतेसाठी केलेले काम कौतुकास्पद असल्याचे पंतप्रधान म्हणाले. चंद्रकिशोर पाटील हे लोकांना गोदावरी नदीत कचरा टाकण्यापासून रोखतात. देशातील अनेक लोक जलसंधारणावर खूप काम करत आहेत. याबाबत त्यांनी महाराष्ट्रातील रोहनच्या विहिरी स्वच्छ करण्याच्या मोहीमेचे भरभरून कौतुक केले.

पुढे पंतप्रधान म्हणाले, ” मी ‘मन की बात’ श्रोत्यांना महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित ठिकाणांना भेट देण्याचे आवाहन करेन. तिथे तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. काही दिवसांनी नवरात्र सुरु होत आहे. नवरात्रीमध्ये आपण उपवास करतो, शक्तीचा अभ्यास करतो, शक्तीची उपासना करतो, म्हणजेच आपल्या परंपरा आपल्याला आनंद आणि संयम शिकवतात. संयम आणि दृढता हा देखील आपल्यासाठी एक सण आहे, त्यामुळे नवरात्री आपल्या सर्वांसाठी नेहमीच खूप खास आहे.”

हे ही वाचा:

‘मातोश्री’ चरणी यशवंत जाधवांचे २ कोटी आणि ५० लाखांचे घड्याळ

किरीट सोमय्या, निलेश राणे रत्नागिरी जिल्ह्यातून हद्दपार

चेन्नईला नमवून कोलकाताचा विजयी शुभारंभ

चीनमधील त्या विमान अपघातात १३२ जणांचा मृत्यू

पंतप्रधानांचे हे रेडिओ भाषण दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी होते. दार महिन्याला या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी सर्वसामान्यांकडून सुचन आणि तक्रारी मागवतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकही मोठ्या प्रमाणात आपल्या तक्रारी आणि सूचना मांडतात. पुढे मग दार महिन्याच्या शेवटच्या रविवारी ‘मन की बात’ मधून लोकांच्या तक्रारींचे पंतप्रधान निरसन करतात.

Exit mobile version