कर्नाटक काँग्रेसने शपथविधीनंतर आपल्या पाच आश्वासनांची पूर्ती करण्याची पावले तातडीने उचलली. या पाच आश्वासनांच्या पूर्तीसाठी कर्नाटक सरकारच्या तिजोरीवर ५० हजार कोटींचा भार येणार आहे. राहुल गांधी यांनी शपथविधीनंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत ही पाचही आश्वासने पूर्ण केली जातील असा दावा केला होता. या पाचही आश्वासनांची पूर्तता करण्याचे आदेश नवे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले आहेत.
या पाच योजनांमध्ये प्रत्येक घरातील महिला प्रमुखाला २ हजार रुपये देण्यात येतील तर गृह ज्योती या योजनेअंतर्गत गरिबी रेषेच्या खाली असलेल्यांसाठी २०० युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाईल. अन्न भाग्य योजनेत गरिबी रेषेखालील कुटुंबांना १० किलो तांदूळ मोफत दिला जाईल तर शक्ती या योजनेत महिलांसाठी मोफत बससेवा असेल. युवा निधी योजनेत प्रत्येक बेरोजगार पदवीधर युवकाला ३ हजार रुपये महिना आणि बेरोजगार डिप्लोमा धारकाला १५०० रुपये महिना दिले जातील.
हे ही वाचा:
१०० तासांत १०० किलोमीटरचा एक्सप्रेस वे बांधला !
कुठे आहे विरोधी ऐक्य? कर्नाटक शपथविधीला सोनिया, ममता आणि ठाकरे गैरहजर !
ऋषी सुनक यांचे एका वर्षात २००० कोटींहून अधिक नुकसान !
राज ठाकरे, ही धरसोड नाही… हे आधीच ठरले होते!
कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने या आश्वासनांना महत्त्वाचे स्थान दिले होते. राहुल गांधी यांनी शपथविधीनंतर ट्विट करत आम्ही जे आश्वासन देतो ते पूर्ण करतो. पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही दिलेल्या ५ आश्वासनांची पूर्ती झाली आहे. निवडणुकीआधीही या योजनांना आम्ही पहिल्या कॅबिनेट बैठकीत अमलात आणू असे आश्वासन देण्यात आले होते. खरे तर, सिद्धरामय्या यांनी शपथविधीनंतर पत्रकार परिषदेत आठवड्याभरात योजनांवर निर्णय होईल, असे म्हटले होते पण राहुल गांधी यांनी एक दोन तासातच निर्णय होतील, असे म्हटल्यामुळे ते निर्णय घ्यावे लागले.