विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा सवाल
महाराष्ट्रात सरसकट मोफत लसीकरण होणार अशी घोषणा राज्यातील ठाकरे सरकारने केल्यानंतर १ मेपासून मोफत लसीकरण होणार नाही, असेही सांगून टाकले आहे. त्यामुळे ते केव्हा होणार हा प्रश्न गुलदस्त्यात आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी त्यावर आक्षेप घेत राज्य सरकारने मोफत लसीकरणाची घोषणा तर केली पण १ मे पासून लसीकरण का करणार नाही, असा प्रश्न उपस्थित केला. राजकारणापलीकडे जाऊन लसीकरण मोहीम राबवा, असे म्हणत जशी लस उपलब्ध होईल, तशी ती लोकांना दिली गेली पाहिजे. अमूक साठा जमा झाल्यावरच लसीकरण करू असे धोरण नको, असे दरेकर म्हणाले.
हेही वाचा:
रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीत भीषण आग; जीवितहानी नाही
महाराष्ट्रात सरसकट मोफत लसीकरण
लसीकरण केंद्रातील रांगांवर जालीम डोस कोणता?
१५ मे पर्यंत ‘कडक निर्बंध’ कायम
निश्चित वेळेत लसीकरण झाले नाही तर ज्या दरम्यान ज्या संकटाला सामोरे जावे लागेल ते चिंता वाढविणारे असेल. केंद्राशी वाद न घालता समन्वयातून लस उपलब्ध करून घेणे, खासगी लस उपलब्ध करून घेणे. १ मे पासून उत्तम नियोजन करत लस देणे आवश्यक आहे. युद्धपातळीवर लस उपलब्ध करून घ्यावी, असे दरेकर म्हणाले.
त्यांनी सांगितले की, राजकारणाच्या पलीकडे जाऊन लसीकरणाची मोहीम पार पाडावी. विरोधी पक्षही सरकारसोबत आहेत. एकीकडे मोफत लस जाहीर करायची पण दुसरीकडे लस उपलब्ध नाही, असेही सांगायचे. मुंबईचे मनपा आयुक्त म्हणाले की, लस उपलब्ध झाली नाही तर तर केंद्र चालू करणार नाही. अशा भूमिका योग्य नाही. जशी लस उपलब्ध होईल, तशी केंद्र सुरू ठेवावीत. अखंडपणे लसी देण्याची मोहीम सुरू ठेवावी.
लसीकरण सुलभ करण्याची सगळ्यांचीच मानसिकता आहे. पण नियोजनाची जबाबदारी राज्य सरकारची आहे. पुण्यात लसीकरण केंद्र बंद होती. मुंबईत केंद्र बंद होती. आता तरी लसीकरणावरून राजकारण करू नका. लस उपलब्ध नाही पण आम्ही मोफत लस देऊ अशी घोषणा करून सरकार मोकळे झाले आहे. त्याचा काय उपयोग?
रेमडेसिवीर बगलबच्च्यांनी वितरित केली की काय?
दरेकर यांनी रेमडेसिवीरबद्दलही आपले मत मांडले. ते म्हणाले की, माझी जाहीर मागणी आहे की, केंद्राने किती रेमडेसिवीर किती दिली, किती राज्याकडे आली. याचा आकडा जाहीर करा. जिल्हाधिकाऱ्यांकडून किती वितरण झाले, कुठे झाले याची माहिती द्या. रेमडेसिवीर जी आली ती राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घेतली आणि आपल्या बगलबच्च्यांच्या मार्फत वितरित केली, असा माझा थेट आरोप आहे. त्यामुळे रेमडेसिवीरची आकडेवारी बाहेर येऊ द्या.